लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

नितीन मते आणि डुकरे यांच्या नेतृत्वात जेलभरो आंदोलन.प्रशासनाची तारांबळ उडाली.

जिल्हाप्रमुख नितीन मते आणि डुकरे यांच्या नेतृत्वात जेलभरो आंदोलन.

प्रशासनाची तारांबळ उडाली. 

वरोरा : वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रातील शेतकरी ओल्या दुष्काळामुळे त्रस्त असून, शासनाने कर्जमाफीचे आश्वासन पाळले नाही आणि शेतमालाला योग्य भाव, चंद्रपूर जिल्हा दुष्काळग्रस्त मिळत नसल्याचा आरोप करत शेतकरी नेत्यांच्या नेतृत्वात जेलभरो आंदोलन मंगळवारी आनंदवन चौक येथे करण्यात आले.

बाजार समितीचे संचालक  नितीन मत्ते आणि सामाजिक कार्यकर्ते किशोर डुकरे यांच्या नेतृत्वात चिमूर रोडवरील आनंदवन चौकामध्ये शेतकऱ्यांनी रोड जाम करून सरकार विरोधी घोषणा देत रस्ता बंद केला. यावेळी पोलीस प्रशासनाचा चोक बंदोबस्त असून ठाणेदार अजिंक्य तांबडे यांनी घटनास्थळी पोहोचून शेतकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र शेतकरी समजण्याच्या परिस्थितीत नव्हते. नितीन मते आणि किशोर डुकरे यांनी शेतकऱ्यांना संबोधन करीत रस्ता अडवून धरला होता.
शेतकऱ्यांनी जेलभरो आंदोलन असल्याचे सांगून पोलिसांनी आम्हाला अटक करावी. अशी भूमिका घेतल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली. आनंदवन चौकातील आंदोलन उग्र होत चालले होते. उपविभागीय अधिकारी बकाल यांनीओ समजावण्याचा प्रयत्न केला . मात्र आंदोलन तीव्र करीत आनंदवन चौक ते पोलीस स्टेशन वरोरा लगभग तीन किलोमीटर  मार्गावर सर्व शेतकरी चालत जाऊन वरोरा पोलीस स्टेशन गाठले. मात्र वरोरा पोलीसांनी आंदोलकास आतमध्ये येण्यास मज्जाव केल्याने आंदोलन तीव्र झाले. आंदोलकांचा मोर्चा तहसील कार्यालयात वळला. बराच काळ या ठिकाणी आंदोलक बसून राहले. मागील बरंच वेळापासून  हीच परिस्थिती तहसील कार्यालयामध्ये दिसून आली. आंदोलन तहसील कार्यालयाच्या परिसरात ठिय्या मांडून बसले होते.

वरोरा उपविभागीय अधिकारी संदीप भस्के यांनी वरिष्ठासोबत संपर्क साधून शेतकऱ्याचे निवेदन स्वीकारले. सोयाबीन हे पिक महिन्यापासून पाण्यामध्ये असल्यामुळे  मूळ सड आणि खोड सड याची पाहणी करून तात्काळ त्याचा लाभ देण्यात यावा. अशी मागणी मते यांनी केली आहे . यानंतर सगळ्या शेतकऱ्यांनी  संध्याकाळी आंदोलन थांबविले.


*****





Comments