लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

रानतळोधी येथे आरोग्य तपासणी व उपचार शिबिर संपन्न

रानतळोधी येथे आरोग्य तपासणी व उपचार शिबिर संपन्न 

 वरोरा 
       तालुक्यातील रानतळोधी( नवीन) येथे  ओज बहुउद्देशीय संस्था वरोरा,वेद संस्था वरोरा व हेल्पेज इंडिया,वरलक्ष्मी फॉउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.
 या शिबिराचे उद्घाटन वेध संस्थेचे कार्यकर्ता विलास माटे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून नं. रानतळोधी गावच्या सरपंच काजोल मडावी, उपसरपंच कैलास कुमरे  व ग्रा. सदस्य श्री. मंगलदास आत्राम  ओज संस्थेचे सचिव आशिष रॊकडे, हेल्पेज इंडिया संयोजिका राशेदा शेख , डॉ. शेख इत्यादी उपस्थित होते. 
 हेल्पेज इंडिया व वरलक्ष्मी फाउंडेशन वरोरा द्वारा गावातील  58 लोकांची आरोग्य तपासणी करून उपचार करण्यात आले. रानतळोधी गाव हे 98 टक्के आदिवासी असून या गावाला आरोग्य सेवा मिळत नाही. गावाचे पुनर्वसन झाले असून शासकीय सुविधा पासून गाव वंचित आहे.  बी.पी.,शुगर,सर्दी,ताप,खोकला इत्यादी आजारावर उपचार करण्यात आले. याकरिता डॉक्टर शेख व राशीदा शेख व त्यांच्या टीमने मोलाचे योगदान दिले. 
      कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरपंच,सदस्य व गावातील बचत युवक महीला गटांनी सहकार्य केले आहे. असे रमेश चौधरी यांनी कळविले.

Comments