लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

*क्लोरीन गॅस गळतीवर प्रशासनाकडून तातडीने नियंत्रण*

*क्लोरीन गॅस गळतीवर प्रशासनाकडून तातडीने  नियंत्रण* 

चंद्रपूर, दि.18 : रहमत नगर परिसरातील चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशन (CTPS) च्या सिव्हेज ट्रीटमेंट प्लान्ट (STP PLANT) येथे  क्लोरीन गॅस गळतीची घटना घडली. यासंदर्भात मनपा प्रशासनाकडून तातडीने नियंत्रणात्मक उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देत संबंधित विभागांकडून आवश्यक ती कार्यवाही करण्यात आली असून सद्यस्थितीत परिस्थिती नियंत्रणात आहे.

नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षेच्या दृष्टीने गळतीमुळे होणारा संभव्य धोका पाहता परिसरातील १२५ नागरिकांना मनपाच्या यंत्रणेद्वारे महात्मा ज्योतिबा फुले शाळा, किदवाई हायस्कूल येथे स्थलांतरित करण्यात आले. मनपाच्या प्रभारी आयुक्त विद्या गायकवाड यांनी घटना स्थळी  पाहणी केली व प्रशासनास आवश्यक त्या सूचना दिल्या त्यानुसार मनपाचे अति. आयुक्त  चंदन पाटील, उपायुक्त  संदीप चिद्रावार यांनी प्रभावित नागरिकांना सुरक्षितपणे स्थलांतरित करण्याच्या सूचना दिल्या व त्यानुसार सर्व नागरिक सुरक्षित रित्या स्थलांतरित करण्यात आले. तसेच, वैद्यकीय पथके व आपत्कालीन सेवा मनपाद्वारे घटनास्थळी सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. त्यानुसार परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून सर्व नागरिकांना घाबरून न जाण्याच्या विश्वास मनपाद्वारे देण्यात येत आहे. 

घटनास्थळी नियंत्रण ठेवण्यास पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस  अधिकारी सुधाकर यादव, पोलीस निरीक्षक असिफ शेख, निशिकांत रामटेके, अमोल काचोरे, दंगा नियंत्रण पथक, इतर पोलीस अधिकारी व अमंलदार इत्यादी अधिकारी उपस्थित होते 

*स्थलांतरित 125 नागरिकांना मनपाद्वारे सर्व सेवा उपलब्ध*
स्थलांतरित करण्यात आलेल्या 125 नागरिकांसाठी महात्मा ज्योतिबा फुले शाळा व किदवाई हायस्कूल येथे राहण्याची, पाणी, जेवणाची व निवासाची संपूर्ण व्यवस्था मनपाद्वारे करण्यात आली आहे आणि मनपाचे सर्व अधिकारी व कर्मचारी परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत.
एस बँकेचे ग्रुप एक्झिकीटिव उपाध्यक्ष श्री समीर गेटमे व विदर्भ एक्झिकीटिव श्री आनंद हलदरकर यांनी माझी भेट घेतली असता त्याचे बँके तर्फे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युगग्रंथ “ ग्रामगीता”प्रदान करून मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

Comments