लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

जिल्हाधिका-यांनी घेतला उद्योग विभागाचा आढावा**Ø लॉजिस्टिक पार्कला गती देण्याचे निर्देश*

*जिल्हाधिका-यांनी घेतला उद्योग विभागाचा आढावा*

*Ø लॉजिस्टिक पार्कला गती देण्याचे निर्देश*

चंद्रपूर, दि. 26 :  जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या अध्यक्षतेत जिल्हा उद्योग मित्र समिती, जिल्हास्तरीय निर्यात प्रचलन परिषद, स्थानिक लोकांना रोजगार आणि सामाजिक दायित्व निधीबाबत आढावा घेण्यात आला. बैठकीला अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक ऋतुराज सुर्या यांच्यासह चंद्रपूर जिल्ह्यातील विविध उद्योगविषयक संघटनाचे पदाधिकारी, अल्ट्राटेक, धारीवाल, लॉयड मेटल इत्यादी अनेक कंपन्याचे प्रतिनिधी, संबंधित कार्यालयाचे प्रमुख उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, चंद्रपूर हा औद्योगिक जिल्हा असून जिल्ह्यात उद्योगांना सुलभ वातावरण निर्माण करण्यासाठी जिल्हा प्रशासन कटीबद्ध आहे. जिल्ह्यातील निर्यातवाढी करीता मुल येथे प्रस्तावित असलेले लॉजिस्टीक पार्कला गती देण्यात यावी. तसेच चंद्रपूर मध्ये जेपी असोसिएशन ही टेस्टींग लॅब व बँक ऑफ इंडीया चंद्रपूर येथे परकीय चलन कक्ष प्रस्तावित असून चंद्रपूर जिल्ह्यातील निर्यात वाढीकरीता खुप फायदेशिर ठरणार आहे. एमआायडीसी क्षेत्रातील उद्योगांना भेडसावणाऱ्या अडचणी तातडीने दूर करण्याच्या सुचना जिल्हाधिका-यांनी संबधित विभागांना दिल्या.

 सर्व कंपन्यांनी दरवर्षी स्थानिकांना रोजगाराबाबतचा अहवाल महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र यांच्याकडे सादर करावे व उद्योगामध्ये जास्तीत जास्त स्थानिकांना प्राधान्य द्यावे.  सन 2024-25 मध्ये खर्च केलेल्या सीएसआर निधीबाबत तसेच सन 2025-26 च्या खर्च नियोजनाबाबत अहवाल महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र यांना सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.

नवउद्यो्गासाठी एमआयडीसी मधील भुखंड उपलब्ध बाबतची माहिती chanda.nic या जिल्हा संकेतस्थाळावर अपलोड करावी. तसेच प्रस्तावित असलेल्या रेडियल वेल बंधाऱ्याचे प्रकरण लवकरात लवकर निकाली काढण्याचे कार्यकारी अभियंता पाठबंधारे विभाग यांना निर्देश देण्यात आले. एमआयडीसी मधील व समोरील रस्ते दुरुस्तीबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला निर्देश देण्यात आले. औद्योगिक घटकांना नियमित विद्युत पुरवठा होण्याकरीता नविन फीडर बाबत महावितरणला सुचना देण्यात आल्या.

००००००

Comments