लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

शिक्षण विभागाची चित्रकला परीक्षा एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षा संपन्न.

शिक्षण विभागाची चित्रकला परीक्षा एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षा संपन्न. 

चित्रकला विषय विद्यार्थ्यांची आकलन शक्ती वाढवते. 
चित्रकला शिक्षक कांबळे सर.

वरोरा 
चेतन लूतडे 


महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, मुंबई विभागातर्फे
शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा २०२५ चे आयोजन दिनांक २४ सप्टेंबर, २०२५ ते दिनांक २७ सप्टेंबर, २०२५ या कालावधीमध्ये करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील चित्रकला परीक्षेत बऱ्याच विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शवला असून, वरोरा तालुक्यातील जवळपास आठशे विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. 
महाराष्ट्र शासनाच्या कला, क्रीडा ,कार्यानुभव या विषयासाठी  खाजगी आणि सरकारी क्षेत्रात  शिक्षकांचा अभाव असून या विषयासाठी बऱ्याच विद्यार्थ्यांची दिवसेंदिवस उदाणसीता वाढत चालली आहे. त्यामुळे शैक्षणिक विभागाकडून या विषयासाठी भरीव मदत व लक्ष देण्याची गरज आहे. 

चंद्रपूर जिल्ह्यात शिक्षण विभागातर्फे  राबविण्यात येणाऱ्या बऱ्याच शाळेमध्ये हा विषय सुद्धा शिकवल्या जात नाही. त्यामुळे भविष्यात विद्यार्थीच्या कलागुणांना वाव न मिळाल्याने विद्यार्थी निष्क्रिय होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

मात्र वरोरा तालुक्यातील लोकमान्य विद्यालयात चित्रकला व क्रीडा विषयाला बाकीच्या विषया प्रमाणे महत्त्व प्राप्त करून दिले आहे. त्यामुळेच या शाळेतील विद्यार्थी चित्रकला व क्रीडा, संगीत स्पर्धेत प्राविण्य प्राप्त करून भविष्य घडवित आहे. याचे सर्व श्रेय विद्यार्थ्यांनी शिक्षकांना दिले आहे.चित्रकला विषय विद्यार्थ्यांची आकलन शक्ती वाढवते. इतर विषया प्रमाणे विद्यार्थ्यांना  भवितव्य घडवता येते. असे मत लोकमान्य विद्यालयाचे चित्रकला शिक्षक कांबळे सर यांनी सांगितले.
******************


Comments