लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

अष्टविनायक गणेश मंडळाच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन संपन्न.ऑटो संघटनेचा सर्वधर्म समभाव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक.

अष्टविनायक गणेश मंडळाच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन संपन्न.

ऑटो संघटनेचा सर्वधर्म समभाव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक.

 अध्यक्ष.बाळू उपलंचिवार यांचे नेतृत्वात दिला सामाजिक व संघटनात्मक एकतेचा परिचय.

सर्व पक्षीय नेते व कार्यकर्ते एकजुटीने बाप्पाच्या चरणी.

तालुका प्रतिनिधी( भद्रावती):-

 मुख्यमंत्री सहायता निधी धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष व ऑटोरिक्षा असोसिएशन अष्टविनायक गणेश मंडळाच्या वतीने दिनांक 3 रोज बुधवार ला स्थानिक नवीन बस स्थानक परिसरातील ऑटो स्टॅंड येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
 सकाळी दहा ते तीन या वेळात सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले  या आरोग्य सेवेचे उदघाटन माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर  यांच्या शुभहस्ते पार पडले.प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा शहर अध्यक्ष सुनील नामोजवार,  माजी उपाध्यक्ष प्रफुल चटकी,  ऑटो संघटनेचे अध्यक्ष बाळू उपलंचीवार आनंद चेट्टी ,पत्रकार सुनील बिपटे आदी मान्यवर  उपस्थितीत होते.
या शिबिरात विविध आजारावर तपासण्या व औषधोपचार करण्यात आले.तालुका वैद्यकीय कार्यालय मार्फत अनुभवी डॉक्टर व त्यांची टीम यांनी विशेष योगदान दिले. 

अनेक स्त्री पुरुषांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आरोग्य सेवेचा लाभ घेतला .
ऑटोरिक्षा असोसिएशनचे अध्यक्ष बाळू उपलंचीवार, उपाध्यक्ष सनमोहन केशवन, यशस्वी सहारे, राजू बालपप्पा, प्रकाश मेंढे, रमेश पाटील, राहुल रामटेके, अझहर शेख, सरफराज पठाण, संजय शेंडे, गणेश गजलेकर, शशी कवाडे आदींनी या आरोग्य सेवेच्या यशस्वी आयोजनात विशेष योगदान दिले.
याप्रसंगी शहर अध्यक्ष सुनील नामोजवार यांनी हे अष्टविनायक गणेश मंडळ सर्वधर्म सम भावाचे प्रतीक असून हिंदू, बौद्ध, मुस्लिम व इतरही संस्कृती व विविध उत्सव साजर करणार व सर्व जाती धर्मात एकता निर्माण करणार मंडळ असल्याचे सांगितले.

Comments