लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

वरोरा येथे पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त स्वच्छता अभियान व वृक्षारोपण

वरोरा येथे पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त स्वच्छता अभियान व वृक्षारोपण

वरोरा 
चेतन लूतडे 

वरोरा, दिनांक १७ सप्टेंबर, २०२५ (बुधवार): पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांच्या ७५व्या वाढदिवसाच्या निमित्ताने वरोरा विधानसभा मतदारसंघ क्र. ७५ अंतर्गत बावणे ले-आउट, जितामाता प्रभाग क्र. ९ येथे 'स्वच्छता अभियान' व 'एक पेड माँ के नाम' या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
जाहिरात
या कार्यक्रमात सौ. सुशमा बोदाळकर (बूथ प्रमुख), सौ. प्रणिता मानकर (मन की बात प्रमुख), श्री. अभय मडावी (प्रभाग प्रमुख तथा जिल्हा महामंत्री, भाजपा आदिवासी आघाडी), श्री. गजानन राऊत (शक्ति केंद्र प्रमुख), श्री. प्रज्वल अंड्रस्कर, सौ. अन्नपुर्णा तिखट, सौ. सुनंदा भारस्कर, सौ. पुष्पलता मुळतेली, सौ. अनिता पिजदुरकर, सौ. मंजुशा पिजदुरकर, सौ. सुनंदा लांडे, सौ. कल्पना पोटदुखे, सौ. कलावती सूर, सौ. सुनंदा दुर्वे, सौ. सुनिता ढोगळे, सौ. वंदना काळे, सौ. अनिता वांडरे, सौ. कल्पना पाझारे, सौ. प्रिती लोनगाडगे, सौ. जोती मत्ते, सौ. दुर्गा नंन्नावारे, सौ. शोभा ढवने, सौ. शारदा नंन्नावारे, सौ. सिंधु तुरानकर, सौ. बेबीताई गडमडे, सौ. प्रियंका शिरसागर, सौ. चंद्रभागा बावणे, सौ. निलीमा पाटील, सौ. वैष्णवी काळे, सौ. वंदना दर्वे, सौ. ललीता आत्राम, सौ. सुमन आत्राम, सौ. सुनंदा भोयर, सौ. आस्करताई, सौ. निबुदेताई, सौ. संगिता काळे, सौ. पुनम नवघरे, श्री. वासुदेव भोयर, श्री. महादेव बोदाडकर, श्री. नत्थूजी मुळतेली, श्री. राजु चिंचोलकर तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या प्रसंगी स्वच्छता कार्यासाठी सहभागी कार्यकर्त्यांनी प्रदेशातील स्वच्छता मोहीम राबवून पर्यावरण जागृतीचा संदेश दिला. तसेच वृक्षारोपण करून 'हरित भारत'च्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांसाठी अल्पोहाराची व्यवस्था करण्यात आली होती.
...............

Comments