लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष श्री. रवींद्र शिंदे यांच्या कार्यालयातून पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षलागवड कार्यक्रमाचे आयोजन

*पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षलागवड मोहीम संपन्न*

*सेवा पंधरवाडा अभियान २०२५ तसेच हरीत महाराष्ट्र समृध्द महाराष्ट्र मोहीम*

चंद्रपुर:

नविन व समृध्द भारताचे शिल्पकार, लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा अभियान २०२५ तसेच हरीत महाराष्ट्र समृध्द महाराष्ट्र मोहीम अंतर्गत वनपरीक्षेत्र अधिकारी भद्रावती (प्रादे.) चंद्रपूर वनविभाग व्दारा आज (दि.१७) ला वृक्षलागवड मोहीम २०२५ सोहळा आयोजन करण्यात आले.

या वृक्षलागवड सोहळयास प्रमुख उपस्थिती चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या. चंद्रपूर अध्यक्ष रविंद्र शिंदे, भद्रावती वनरीक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राजू डोंगे, नगर परीषदचे माजी उपाध्यक्ष संतोष आमणे, स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरीयल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले, भाजपा पदाधिकारी अमित गुंडावार, ईम्रान खान, अशोक निखाडे तथा भद्रावती वनविभाग क्षेत्र सहाय्यक विकास शिंदे, क्षेत्र सहाय्यक अरविंद शेळकी, व्ही आर ठाकरे, वनरक्षक ज्योत्सना माऊलीकर, संजय पेंदोर, एस. एस. मेश्राम, ए. बी. रोहीले, एम. आर. देठे, एच. एस. भवरे, एन.व्ही. निरांजणे, ए. एम. चाहांदे, एम. आर. चौधरी, एस. आर. कुळमेथे, ज्ञानेश्वर धंदरे वनअध‍िकारी कर्मचारी उपस्थित होते. 
वृक्षलागवड सोहळा कार्यक्रमाचे संचालन वनरक्षक जे. ई. देवगडे यांनी केले.

Comments