वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

आमदार सुधीर मुनगंटीवार यांना लंडनमध्ये ‘कोहिनूर ऑफ इंडिया’ पुरस्कार प्रदान



*लंडनमध्ये आ. सुधीर मुनगंटीवारांचा गौरव, ‘कोहिनूर ऑफ इंडिया’ पुरस्काराने सन्मानित*

*आ. मुनगंटीवार यांना ‘ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’मध्ये बहाल झाला ‘कोहिनूर ऑफ इंडिया’ पुरस्कार*

*आ. मुनगंटीवार यांच्यावर होतोय अभिनंदनाचा वर्षाव*

*लंडन- राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. ‘लोकमत’ समूहाच्या वतीने लंडन येथे आयोजित भव्य ‘ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’ मध्ये त्यांना ‘कोहिनूर ऑफ इंडिया’ या सर्वोच्च पुरस्काराने (१८ ऑगस्ट) रोजी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष श्री. राहुलजी नार्वेकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार स्वीकारताना आ.मुनगंटीवार सपत्नीक उपस्थित होते.“हा केवळ पुरस्कार नाही, तर जनसेवेच्या अखंड प्रवासाला मिळालेली प्रेरणा आहे. ज्या अपेक्षेने माझी निवड झाली, त्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी मी अखेरच्या श्वासापर्यंत जनसेवा करीत राहीन,” अशी भावना आ. सुधीर मुनगंटीवार यांनी याप्रसंगी व्यक्त केली.*

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे भारतात परत आणणारे आ. सुधीर मुनगंटीवार यांना त्याच लंडनच्या भूमीत मिळालेला हा सन्मान महाराष्ट्रासाठी आणि विशेषतः चंद्रपूर जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे. ‘ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’ या प्रतिष्ठित व्यासपीठावर भारताच्या पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे वाटचालीचे विश्लेषण, जागतिक व्यापारातील भारताची भूमिका, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा व हरित ऊर्जा या विषयांवर सखोल चर्चा झाली. अशा भव्य सोहळ्यात आ. मुनगंटीवार यांना ‘कोहिनूर ऑफ इंडिया’ पुरस्कार बहाल होणे हे त्यांच्या बहुआयामी कार्याचा आंतरराष्ट्रीय गौरव ठरला आहे.

‘देशाच्या प्रगतीसाठी दिलेल्या आपल्या अद्वितीय योगदानामुळे आम्हाला अभिमान आहे. या जागतिक व्यासपीठावर आपल्या कार्याचा उत्सव साजरा करणे ही आमच्यासाठी गौरवाची बाब आहे,’ असे लोकमत समूहाचे चेअरमन श्री. विजयजी दर्डा यांनी गौरवपत्रात नमूद केले आहे.

*पुरस्कारांचे सुवर्णदालन*
आ. मुनगंटीवार यांच्या कार्याला यापूर्वीही असंख्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय गौरव प्राप्त झाले आहेत. गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठाने बहाल केलेली डी.लिट., आज तक आणि इंडिया टुडे तर्फे मिळालेले दोन वेळचे ‘बेस्ट फायनान्स मिनिस्टर इन इंडिया’, स्व. अरुण जेटली यांच्या हस्ते झालेला गौरव, ४ लिम्का रेकॉर्ड, २ गिनेस बुक रेकॉर्ड, वृक्षलागवडीसाठी देशगौरव,पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये केलेला विशेष उल्लेख, कार्यालयाला मिळालेला देशातील पहिला ISO दर्जा, तसेच महाराष्ट्रियन ऑफ द इयर, फेम इंडिया उत्कृष्ट मंत्री पुरस्कार आणि अशा असंख्य सन्मानांनी त्यांचा प्रवास उजळला आहे.

*महाराष्ट्रासाठी अभिमान*
‘कोहिनूर ऑफ इंडिया’ हा पुरस्कार केवळ एखाद्या व्यक्तीचा नाही, तर महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक वैभवाचा सन्मान आहे. चंद्रपूरच्या मातीतून उभा राहिलेले अभ्यासू नेत्याला आज जागतिक स्तरावर मानाचा तुरा ठरत आहे. आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वगुणांची, जनसेवेतल्या निष्ठेची आणि विकासदृष्टीची ही मिळालेली दाद महाराष्ट्राच्या अभिमानात भर घालणारी ठरली आहे.

Comments