लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

*वरोड्यातील युवक बेपत्ता*

*वरोड्यातील युवक बेपत्ता* 

वरोडा : श्याम ठेंगडी 

       वरोडा येथील शिवाजी वार्डातील एक युवक 19 ऑगस्ट पासून बेपत्ता आहे. नातलग सदर युवकाचा शोध सर्वत्र घेत असून सहा दिवस उलटल्यानंतरही तो अजूनपर्यंत सापडला नसल्याने सर्वजण चिंतेत आहेत.
         वरोडा येथील शिवाजी वार्डात राहणारा रवींद्र उर्फ गोल्या गजानन देशमुख वय तीस वर्ष हा दुधाचा व्यवसाय करतो. दोन तीन दिवसापासून म्हशी घरी न आल्याने तो 19 ऑगस्ट रोज मंगळवारला म्हशीच्या शोधार्थ वनोजापर्यंत गेला असता त्याला त्याच्या म्हशी दिसून आल्या. म्हशींना आपल्या गावाकडे घेऊन येताना त्याने आपली सायकल वनोजा येथील ठेवली व तो म्हशीना घेऊन वरोड्याकडे निघाला. वनोजा येथील गणपती मंदिरापर्यंत तो म्हशी घेऊन जात असल्याचे लोकांनी पाहिले. परंतु त्यानंतर मात्र तो कोणालाही दिसला नाही. म्हशी मात्र घरी परत आल्या.
     तो 19 ऑगस्ट पासून घरी न आल्याने आई-वडिलांनी दुसऱ्या दिवशी म्हणजे 20 ऑगस्टला वरोडा पोलीस स्टेशन येथे मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पण अजून पर्यंत त्याचा पत्ता लागलेला नाही. सदर युवक कोणास आढळून आल्यास त्यांनी 9673879855 किंवा 7507715298 या क्रमांकावर संपर्क साधावा अशी विनंती  नातलगांनी केली आहे.

Comments