लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

सीमेवरील जवानांसाठी लोकमान्य विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पाठविल्या राख्या ....!

सीमेवरील जवानांसाठी लोकमान्य विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पाठविल्या राख्या ....!

वरोरा दि ७ ऑगस्ट

भारताच्या सीमांचे रक्षण करतांना आपले कुटुंब ,सण - उत्सव आणि व्यक्तिगत आयुष्य बाजूला ठेवणाऱ्या सैनिकांचे योगदान अमूल्य आहे. त्यांच्या त्यागामुळेच आपण सर्व नागरिक सुरक्षित आहोत. हा भाव लक्ष्यात घेऊन लोकमान्य विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सदर उपक्रम राबविला.  
      सीमेवर उभा असलेला सैनिक हा वर्दीतला माणूस नाही तर  तो आपल्या श्वासाचे रक्षण करणारा देवदूत आहे.  राखीच्या प्रत्येक धाग्यांमध्ये प्रेम , कृतज्ञता आणि अभिमानाचे प्रतीक असलेली भावना गुंफलेली आहे . या राख्या सैनिकांना केवळ बहीण -भावाच्या नात्याची आठवण करून देणार नाही तर त्यांना पाठिंबा ,प्रेम आणि समाजाकडून मिळणारा सन्मानही जाणवून देतील.  हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम जागवणारा असून युवकांना आपल्या देशाच्या सुरक्षिततेसाठी झटणाऱ्या सैनिकांविषयी कृतज्ञता बाळगण्याचा संदेश देणारा आहे असे उद्गार या देशभक्तीपूर्ण उपक्रमाचे आयोजक शाळेचे मुख्याध्यापक राहुल राखे यांनी काढले. या सर्व राख्या आणि शुभेच्छा पत्र मराठा लाईट इन्फेन्ट्री, बेळगाव सैनिकांना पाठविण्यात आल्या .
     एकूण १३७ विद्यार्थ्यांचा सहभाग असलेल्या या उपक्रमासाठी उपमुख्याध्यापक दीपक नवले, डॉ प्रशांत खुळे, सेवानिवृत्त कला शिक्षक अविनाश कांबळे ,आकाश धगवे, अभिषेक चिखलीकर, ईश्वर डाबेराव, महेश मोरे, चंद्रशेखर भोयर, अमोल सलवटकर,अंजली वरुडकर,कु. प्रियंका लांडे, बुद्धभूषण टिपले, यांनी सहकार्य केले.


Comments