लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

कल्पतरू गणेश मंडळाच्या गणपतीच्या आरतीसाठी पत्रकारांना मान, व्हॉइस ऑफ मिडिया संघटनेच्या पत्रकाराची उपस्थिती.

कल्पतरू गणेश मंडळाच्या गणपतीच्या आरतीसाठी पत्रकारांना मान

व्हॉइस ऑफ मिडिया संघटनेच्या पत्रकाराची उपस्थिती.

वरोरा -विशेष प्रतिनिधी

वरोरा येथील प्रसिद्ध कल्पतरू गणेश मंडळाला ‘व्हॉइस ऑफ मिडिया’ या पत्रकार संघटनेच्या पत्रकारांना आरतीचा मान देण्यात आल्याबद्दल पत्रकार अध्यक्षाने आभार मानले आहेत . या समारंभात व्हॉइस ऑफ मिडियाचे राज्य सदस्य दैनिक पुण्यनगरी चे तालुका प्रतिनिधी, अनिल पाटील , लाईव्ह चंद्रपूरचे तथा तालुकाध्यक्ष चेतन लूतडे, दैनिक पुण्यनगरी माढेळीचे अनिल नौकरकार. सकाळ तालुका प्रतिनिधी बालकदास मोटघरे, टॉप मराठी व दैनिक लोकशाहीचे सारथी ठाकूर व दै. पब्लिक पोस्टचे  शिरीष ऊगे यांच्या  उपस्थितत गणेश आरतीचा कार्यक्रम पार पडला.
सामाजिक कार्यकर्ते प्रवीण सुराणा, कल्पतरू गणेश मंडळाचे अध्यक्ष चेतन विजय शर्मा ,शशीभाऊ चौधरी, परीक्षित एकरे , बोराजी यांच्यासह अनेक मान्यवर सदस्य व भाविक भक्त यावेळी उपस्थित होते.
‘वरोराचा राजा’ म्हणून ख्याती प्राप्त असलेल्या कल्पतरू गणेश मंडळाला दूरदूरचे भाविक भेट देतात आणि नवस बोलतात. दरवर्षी नवीन उपक्रम राबविणाऱ्या या मंडळाचे सदस्य सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग देतात. यावर्षी मंडळाकडून वैद्यकीय शिबिरासारखे उपक्रम आयोजित करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. पत्रकार संघटनेतर्फे मंडळाच्या या सामाजिक कार्याचे कौतुक करण्यात आले तसेच त्यांना शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.
कल्पतरू गणेश मंडळातर्फे आलेल्या प्रत्येक पत्रकारांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

वरोरा शहरातील मान्यवर व्यक्तींचा समावेश असलेल्या या मंडळाकडून समाजउपयोगी कार्यासोबतच गरजूंना आर्थिक सहाय्य देण्यात येत असल्याचेही नमूद करण्यात आले. शेवटी, नवसाला पावणाऱ्या या गणपतीकडे पत्रकार संघाला आरतीचा मान दिल्याबद्दल व्हॉइस ऑफ मिडियाचे राज्य सदस्य अनिल पाटील व सर्व उपस्थित सदस्यांनी मंडळाचे आभार मानले.



******************************
जाहिरात

Comments