वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

अदिती रमेश गायकवाड तर हेड बॉय म्हणून रक्षित जितेंद्र जयस्वाल यांची निवड झाली.

अदिती रमेश गायकवाड तर हेड बॉय म्हणून रक्षित जितेंद्र जयस्वाल यांची निवड झाली.

स्टुडन्ट कौन्सिल इन्चार्ज पदी पार्थ सुरेश धानोरकर यांची नियुक्ती.

फक्त बातमी 
चेतन लूतडे वरोरा 

संस्कार भारती पब्लिक स्कूल, मार्डा रोड, वरोरा येथे शालेय मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात आली असून विद्यार्थ्यांचा शपथविधी समारोह नुकताच पार पडला. यात हेड गर्ल म्हणून अदिती रमेश गायकवाड तर हेड बॉय म्हणून रक्षित जितेंद्र जयस्वाल यांची निवड झाली.

 स्टुडन्ट कौन्सिल इन्चार्ज पदी पार्थ सुरेश धानोरकर, डिसिप्लिन मिनिस्टर आयुष भोयर, कल्चरर मिनिस्टर संस्कार खाडे, स्पोर्ट मिनिस्टर अंश अरमुरवार यांची निवड करण्यात आली. अग्नी हाऊस कॅप्टन दर्पण सातपुते आणि जानवी बजाज, आकाश हाऊस कॅप्टन पृथ्वीराज राठोड आणि माही दरेकर, धरती हाऊस कॅप्टन अथर्व माकोडे आणि पुरविलोया, सागर हाऊस कॅप्टन श्रवण काकडे आणि माधवी पिंपळ शेंडे यांची निवड झाली. इको क्लब इन्चार्ज तेजस्विनी वर्मा तर लीडर म्हणून भावेश काकडे, शौर्य ठेंगणे, सोहम बोरावार आणि शगुन तिवारी यांना निवडले गेले. 

कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शालेय अकाडमीक कॉर्डिनेटर अनिल डोंगरे तर प्रमुख अतिथी म्हणून न्यायाधीश सुविधा पांडे (वरोरा), डायरेक्टर सोमेश मालू, प्राचार्य अनुराग मसीह आणि सहाय्यक शिक्षिका श्रद्धा चौबे उपस्थित होते. शिक्षक अक्षय नायक यांनी संचालन केले तर शिक्षिका भारती आल्हाडा आणि प्रथमेश घाटोळे यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर केली. शपथविधीनंतर स्टुडन्ट कौन्सिल इन्चार्ज पार्थ सुरेश धानोरकर यांनी आभार प्रदर्शन केले.

Comments