लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

आंतरमहाविद्यालयीन टेबल टेनिस स्पर्धेत आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाच्या दोन्ही संघांची सरशी"*

" *आंतरमहाविद्यालयीन टेबल टेनिस स्पर्धेत आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाच्या दोन्ही संघांची सरशी"* 

वरोरा 

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत आयोजित आंतरमहाविद्यालयीन टेबल टेनिस स्पर्धा दिनांक १६ ऑगस्ट २०२५ ला वसंतराव नाईक  कृषी जैव-तंत्रज्ञान महाविद्यालय, यवतमाळ येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत आनंद निकेतन कृषी महाविद्यालय, वरोरा येथील मुलांच्या व मुलींच्या संघाने प्रभावी कामगिरी करत प्रथम क्रमांक प्राप्त करून विजयाची मालिका कायम राखली.

दोन्ही संघांनी हे यश कर्णधार प्रेम मरचेट्टीवार व कुमारी भक्ती पातोंड यांच्या कुशल नेतृत्वाखाली संपादन केले. संघाचे व्यवस्थापन डॉ. आर. एम. पारधी यांनी केले असून यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी सादर केली.
या संघात दिव्यांक मोरे, प्रेम मारचिट्टेवार, हर्ष गजभिये, हमद सैय्यद व कुमारी भक्ती पातोंड, रेवा मंगर, दिव्यानी दरोकर, लावण्या शिरसाट या खेळाडूंचा सहभाग होता.

या यशाबद्दल महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकास आमटे, विश्वस्त. श्री.कौस्तुभ आमटे, अंतर्गत व्यवस्थापक सौ. पल्लवीताई आमटे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. पोतदार, विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. आर. एच. राहाटे, शारीरिक शिक्षण विभागाच्या प्रमुख प्रा. ज्योती श्रीराव तसेच इतर प्राध्यापकवृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी संघाचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

Comments