लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

खाजगी पेन्शन धारकांना न्याय द्या. संसद पायऱ्यावर काँग्रेस जोरदार निदर्शने.

खाजगी पेन्शन धारकांना न्याय द्या. संसद पायऱ्यावर काँग्रेस जोरदार निदर्शने. 


वरोरा, 6 ऑगस्ट 
चेतन लूतडे 

आज संसद भवनाच्या पायऱ्यांवर सर्व काँग्रेस खासदारांनी एकत्र येऊन खासगी क्षेत्रातील पेन्शनधारकांच्या न्याय्य आणि सन्मानजनक पेन्शनच्या मागणीसाठी सरकारविरोधी जोरदार आंदोलन केले.

 खासगी क्षेत्रात आयुष्यभर प्रामाणिक सेवा बजावलेल्या असंख्य कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर योग्य पेन्शन मिळावी, ही त्यांची मूलभूत आणि वाजवी अपेक्षा असताना, केंद्र सरकारकडून त्यांच्या या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करत काँग्रेस खासदारांनी हातात फलके व घोषणापत्रे घेऊन संसद भवनासमोर उत्स्फूर्त निदर्शने केलीत.

लोकतंत्र मे बहस जरुरी हैl, चर्चा नको चूप्पी नही चलेगीl, वोटर नही सरकार बदलेगीl  या पद्धतीचे घोषणापत्र लिहून सदनाच्या बाहेर काँग्रेस खासदारांनी तीव्र निदर्शने करून सरकारचे लक्ष वेधले होते.

यामध्ये खासदार प्रतिभाताई धानोरकर, खासदार वर्षाताई गायकवाड यासह अनेक काँग्रेस खासदार उपस्थित होते. काँग्रेस पक्षाने नेहमीच श्रमिक, शेतकरी, कामगार, निवृत्त कर्मचारी व सामान्य जनतेच्या हिताचा पाठपुरावा केला आहे आणि भविष्यातही अशाच प्रकारे सर्व प्रकारच्या अन्यायाविरुद्ध लढत राहील, असे आंदोलनादरम्यान  काँग्रेस पक्षाकडून जाहीर करण्यात आले.


Comments