लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी आमदार करण संजय देवतळे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट .

पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी आमदार करण संजय देवतळे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट .

वरोरा 
चेतन लूतडे 

चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या पोलीस महानिरीक्षक मा. श्री. संदीप पाटील यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मा. श्री. मुम्मका सुदर्शन यांच्या उपस्थितीत आमदार करण संजय देवतळे यांच्या निवासस्थानी एक सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान सद्यस्थितीतील कायदा व सुव्यवस्था, जनतेच्या सुरक्षेसाठी सुरू असलेल्या उपक्रमशील पावलांवर तसेच चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील आणि जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या या दौऱ्यामुळे जनमानसात विश्वास दृढ होणारा आहे आणि प्रशासन व नागरिकांमधील परस्पर समन्वय सुधारण्याच्या दृष्टीने या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

********************

Comments