वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

नवजीवन पोळा समिति भद्रावती चाआकर्षक सुवर्ण महोत्सव संपन्न .....

नवजीवन पोळा समिति भद्रावती चा
आकर्षक सुवर्ण महोत्सव संपन्न .....


भद्रावती :  देवनागरी भद्रावती येथिल विठ्ठल मंदिर परिसरात भरनारा तान्हा पोळा मानाचा पोळा असुन या वर्षी हा सोन्याचा पोळा म्हणून 
संपूर्ण भद्रावतीत आकर्षणाचा विषय ठरला होता 

 नवजीवन पोळा समिति चा सुवर्ण महोत्सव.१९७६ पासुन तान्हा पोळ्यानिमीत्त लहान बालकांना ईनामी कुपण योजनेद्वारे समिति बक्षिस वाटप करीत असते.या वर्षी सुवर्ण महोत्सव निमित्त ५ ग्रॅम सोन्याची चैन कु.गौरी रविन्द्र शिंदे कडुन, दुसरे बक्षिस लैपटाप समिति कडुन,तिसरेबक्षिस इलेक्ट्रॉनिक बेबी जीप नकुल प्रशांत शिंदे तर्फे, चौथेबक्षिस LED TV 32 " रामकृष्ण पत्तिवार पाचवेबक्षिस बेबी बाइक छाया ज्वेलर्स संचित राॅय सहावेबक्षिस5G Redmi मोबा.प्रा. संजय लांबे स्व.ताई चौधरी स्मृ.प्रि.व मराठा मोबा.शाॅपी, सातवेंबक्षिस शिलाईमशीन निलेश गुंडावार किराणा आठवेबक्षिस रेंजरसायकल संजय गुंडावार प्रदिप गुंडावार नववे ड्रेसिंग टेबल गौरीप्रसन्न साहा एंटरप्राइजेस दहावे होम थिएटर आशिष मोबा शापी,११ वे चांदीचा गणपति नागेन्द्र चटपल्लीवार बाळु उपलंचीवार व गोपाल गोसवाडे,१२ वे प्रोत्साहन बक्षिस ११००/- ₹ रोख श्री अनंता देवईकर तर्फे. आकर्षक बक्षिसांची भव्य लयलुट असल्यामुळे लहानबालक युवकयुवती महिला व संपूर्ण भद्रावतीकरांना बक्षिसांनी मोहित केले होते. विठ्ठल मंदिर परिसरातील रस्ते गर्दीने फुलुन गेले होते. डिजिटल स्क्रीन द्वारे दुरच्या प्रेक्षकांना जवळुन हा महोत्सव पाहता येत होता.
     गेल्या पन्नास वर्षापासुन या पोळ्याची परंपरा सुरु असल्यामुळे समितिच्या दिवंगत सभासदांना व परीसरातील दिवंगत प्रतिष्ठित नागरीकांना समिति तर्फे श्रद्धांजली अर्पित करुन या महोत्सवाची सुरुवात करण्यात आली.समितीचे काही सदस्य बाहेरगावला स्थायीक झाल्यामुळे या सुवर्ण महोत्सवाला ऊपस्थित झाले होते. तेच या महोत्सवाचे प्रमुख पाहुणे होते. त्यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देवुन सत्कार करण्यात आला. यात प्रामुख्याने सर्वश्री प्रा. संजय लांबे  (ब्रम्हपुरी), अनंता देवईकर ( नागपुर)व संतोष गुंडावार वरोरा प्रामुख्याने ऊपस्थित झाले होते. या महोत्सवाला स्थानिक प्रतिष्ठित नेत्यांनी सदिच्छा भेट दिली होती समिति तर्फे त्यांचाही स्वागत सत्कार करण्यात आला.

स्थानिक संस्थापक सदस्य कार्यकारिणी सदस्य व युवा सदस्य यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतिने नियोजन करुन नंदीबैल घेवुन येनाऱ्या प्रत्येक बालकांस चाॅकलेट्स व लंचबॉक्स वाटप करुन त्यांचा उत्साह वाढविला. शेवटी लकी ड्रा द्वारा लकी नंबर्स काढुन भाग्यवंतांना बक्षिसं वाटप करन्यात आले. या महोत्सवाला व्यापारी वर्गाने स्वेच्छेने बक्षिसं पुरविली काही व्यापारी वर्गाने स्वेच्छेने शुभेच्छा फलकं लावुन शुभेच्छा दिल्या, परीसरातील जेष्ठ नागरिक व संपूर्ण नागरीकांचे व समिति च्या संपूर्ण सदस्यांचे आभार व्यक्त करुन महोत्सवाची समाप्ती करन्यात आली. हा महोत्सव यशस्वी करन्यासाठी बैनरवर नांव असनाऱ्या संपूर्ण सदस्यांचे योगदान आहे.
*****************
जाहिरात

Comments