लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

स्वीकार मतिमंद शाळेत स्वातंत्र्य दिन सोहळ्याचे आयोजन

स्वीकार मतिमंद शाळेत स्वातंत्र्य दिन सोहळ्याचे आयोजन 

फक्त बातमी 
प्रवीण मुधोळकर

पडोली- श्री साई मतिमंद शिक्षण संस्था ,चंद्रपूर द्वारा संचालित स्वीकार दुर्बल मनस्क ( मतिमंद) निवासी शाळा ,पडोली (मोरवा) येथे स्वातंत्र्य दिन सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून डॉ. राजीव  देवईकर आणि त्यांच्या पत्नी डॉ. मृदुला देवईकर तसेच संस्थेच्या सचिव रेखा पिंपळशेंडे उपस्थित होत्या. सचिव रेखा पिंपळशेंडे यांनी शाळेच्या कार्याची माहिती दिली. डॉ.  देवईकर यांनी आपल्या मनोगतात संस्थेद्वारे मतिमंद यांच्या विकासाकरिता करण्यात येणाऱ्या प्रयत्नांची प्रशंसा केली. याप्रसंगी लायन्स क्लब, चंद्रपूर चे सर्व पदाधिकारी आणि सदस्यांचा सहभाग होता. लायन्स क्लब द्वारे यावेळी संस्थेला संगणक संच भेट देण्यात आला आणि संस्थेच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी  क्लबच्या अध्यक्षा कांचन ढोरे, सचिव सरिता घाटे आणि कोषाध्यक्षा वर्षा कोठेकर यांनी आपले विचार व्यक्त केले. याप्रसंगी शाळेच्या विद्यार्थ्यांनी गीते आणि नृत्य प्रस्तुत केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रभारी मुख्याध्यापिका सुनीता लोढे शालेय शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रकाश राजूरकर यांनी केले.

Comments