लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

*सामाजिक कार्यकर्ते श्री. सुरेंद्रजी देठे यांच्या ५८व्या वाढदिवसानिमित्त टेमुर्डा येथे वृक्षारोपण*

*सामाजिक कार्यकर्ते श्री. सुरेंद्रजी देठे यांच्या ५८व्या वाढदिवसानिमित्त टेमुर्डा येथे वृक्षारोपण*  

टेमुर्डा, ९ ऑगस्ट २०२५
चेतन लूतडे 

सामाजिक कार्यकर्ते श्री. सुरेंद्र गोविंद देठे (सुरेंद्रजी गो. देठे) यांच्या ५८व्या वाढदिवसाच्या निमित्ताने गुरुवारी ग्रामपंचायत टेमुर्डा येथील स्मशानभूमी परिसरात उत्साहात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पर्यावरण संवर्धनाच्या संकल्पनेतून हा सामूहिक कार्यक्रम घेण्यात आला.

कार्यक्रमात ग्रामपंचायत टेमुर्डा येथील सरपंच सुचिता ताई ठाकरे, उपसरपंच विमलताई वाटोरे तसेच विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे अध्यक्ष राजूजी तीखट यांनी प्रमुख भूमिका बजावली. ग्रामपंचायत सदस्य तुलशीराम आगलावे यांच्या सहभागासह ग्रामस्थांची मोठी उपस्थिती लाभली.
कार्यक्रमात उपस्थित असलेल्यांमध्ये नीलकंठ आमटे, पुष्पाकर खेवले, कमलाकर दारुंडे, मिलिंद भोयर, विशाल देठे, समीर देठे, केतन देठे, मनोज गवारकर, राकेश काले, महेश गायकवाड, अनिकेत झिले, निखिल तीखट, अमन पिजदुरकर या सर्व ग्रामस्थांचा सहभाग लाभला.

सर्व उपस्थितांनी एकत्रितपणे स्मशानभूमी परिसराला हिरवळ घालण्यासाठी वृक्ष लावले. वाढदिवसाच्या शुभमुहूर्तावर पर्यावरणरक्षणाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे सर्वांनी स्वागत केले. श्री. देठे यांनी सहभागींचे आभार मानून वृक्षांच्या जोपासनेचा आवाहन केले. त्यांच्या दीर्घायुष्यासाठी सर्व उपस्थितांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.

Comments