लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

*महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या उपाध्यक्षांची मोरवा विमानतळास भेट*

*महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या  उपाध्यक्षांची मोरवा विमानतळास भेट*

चंद्रपूर, दि. 24 : महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड (MADC) च्या  उपाध्यक्षा तथा व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे  यांनी नुकतीच चंद्रपूर येथील मोरवा विमानतळाला भेट दिली. नागपूर फ्लाइंग क्लबने आपला फ्लाइंग सेक्शन प्रशिक्षणासाठी अलीकडेच या ठिकाणी स्थलांतरित केल्याने सदर भेटीचे आयोजन करण्यात आले होते.

मोरवा विमानतळ हे MADC च्या मालकीचे असून, नागपूर फ्लाइंग क्लबला विमान उड्डाण प्रशिक्षणासाठी सुपूर्त करण्यात आले आहे. सौ. पांडे यांचा दौरा या प्रशिक्षण केंद्रातील उपलब्ध पायाभूत सुविधा, तांत्रिक गरजा व भविष्यातील विकास संधींचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आला होता.

यावेळी सौ. पांडे यांनी प्रशिक्षणार्थी कॅडेट्सशी संवाद साधत प्रत्यक्ष प्रशिक्षण अनुभव जाणून घेतला आणि त्यांच्या अडचणी व अपेक्षांचा देखील आढावा घेतला. तसेच नागपूर फ्लाइंग क्लबचे व्यवस्थापकीय संचालक  तेजू सिंग पवार यांच्यासोबत सविस्तर चर्चा करून सध्या सुरू असलेल्या प्रशिक्षण उपक्रमांची माहिती व भविष्यातील योजना जाणून घेतल्या.

राज्यातील विमान प्रशिक्षण क्षेत्रात दर्जात्मक प्रगती साधण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या दृढ संकल्पनेच्या अनुषंगाने महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी सातत्याने प्रयत्नशील आहे. विमान प्रशिक्षण क्षेत्रात महाराष्ट्र राज्याचा अग्रगण्य स्थान प्राप्त व्हावे, या उद्देशाने स्वाती पांडे यांची ही भेट महत्त्वपूर्ण ठरली आहे.

Comments