लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

भद्रावतीत नागपंचमीची भव्य यात्रा, भाविकांची गर्दी

 भद्रावतीत नागपंचमीची भव्य यात्रा, भाविकांची गर्दी  

रवि बघेल भद्रावती
२९ जुलै, २०२५  

भद्रावती येथे नागपंचमी निमित्त भाविकांची गर्दी

रवि बघेल भद्रावती
29/07/2025

भद्रावती शहरात नागपंचमी निमित्त नाग मंदिर येथे भव्य यात्रेचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. यासाठी महाराष्ट्रा राज्यासह  मध्य प्रदेश तेलंगाणातून भावीक दर्शनासाठी येत असतात. भद्रावती तालुक्याच्या ग्राम दैवत म्हणजे भद्रनाग. अतिशय छोटं आणि सुबक असलेल्या या मंदिराला आणि इथल्या भद्र नागाच्या मूर्तीला लोकांमध्ये मोठं श्रद्धेचे स्थान आहे. हे मंदिर किमान एक हजार वर्षे जुनं असल्याचे पुरातत्त्व दाखले आहेत. सध्या अस्तित्वात असलेला हे मंदिर ११४६ साली बांधण्यात आलं.११४६साली भद्रनाग मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आलेला शिलालेख या ठिकाणी आजही आहे.हे संपूर्ण भद्रनाग मंदिर हेमाडपंथी शैलीत बांधण्यात आला आहे. मंदिराचा आकार छोटा असला तरी हेमाडपंथी शैलीची सगळी वैशिष्ट्ये या मंदिरात आहे.
 मंदिराला भक्कम असे ३६ खांब आहेत. आणि ९ फणयांची शेषनागाची सुमारे अडीच फूट उंचीची मूर्ती आहे.मंदिरात प्रवेश करताच अतिशय प्रसन्न वाटते . भद्रनाग मंदिरात नागपंचमीची जोरदार यात्रा भरवण्याची जय्यत तयारी केली आहे. भाविकांची गर्दी होऊ नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त असणारा आहे. मंदिर परिसरात भाविकांनी स्वच्छ्ता राखण्यास मदत  करण्याची विनंती संस्थेने केली आहे. यासोबतच मंदिर परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी भद्रावती पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.



Comments