लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

*महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर युवकांनी घातला गोंधळ* *युवकास पोलिसांनी घेतली ताब्यात!*

*महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर युवकांनी घातला गोंधळ*
 *युवकास पोलिसांनी घेतली ताब्यात!*
वरोडा : 
         शहरातील एका महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर मध्ये मद्यधुंद युवकाने गोंधळ घातला. गोंधळ घालणाऱ्या या युवकाबाबत महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी वरोडा पोलीस स्टेशनला माहिती देताच पोलिसांनी सदर युवकास ताब्यात घेतले.
 याबाबत मिळालेल्या माहितीनुसार हा युवक आज 21 जुलै रोज सोमवारला दुपारच्या सुमारास महाविद्यालयात शिरण्याचा प्रयत्न करत होता. यावेळेस तो मद्धुंद अवस्थेत असल्याने प्रवेशद्वारावर त्याला सुरक्षा रक्षकाने अडविले.
            आपणास ओळखीच्या एका मुलीला भेटायचे असल्याचा कांगावा तो करू लागला. परंतु सुरक्षा रक्षकाने त्याच मज्जाव केल्याने त्याने प्रवेशद्वारावर गोंधळ घालण्यास सुरुवात केली. सदर मुलगी आपल्या ओळखीची असून आपण तिच्याशी विवाह  करणार असल्याचेही तो सांगत होता. गोंधळ घालणारा हा युवक शांत होण्याची चिन्हे न दिसल्याने शेवटी प्राचार्यांनी याची सूचना वरोडा पोलीस स्टेशनला दिली. पोलिसांनी त्वरेने हालचाल करत घटनास्थळी येऊन युवकास ताब्यात घेतले.
सदर मुलगी ही परगावाहून महाविद्यालयाला येणे जाणे करत असल्याने सुरक्षितता म्हणून प्राचार्यांनी तिला पोलीसांच्या स्वाधीन केले आहे.

Comments