लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

*शिवसेनेच्या नव्या जिल्हाप्रमुखाची नियुक्ती लवकरच; विदर्भ प्रमुखांची तयारी*

*शिवसेनेच्या नव्या जिल्हाप्रमुखाची नियुक्ती लवकरच; विदर्भ प्रमुखांची तयारी* 

वरोरा 
चेतन लूतडे 

जिल्हा सहकारी को-ऑपरेटिव्ह बँक च्या निवडणुका नुकत्याच झालेल्या आहेत यामध्ये शिवसेना पक्षाचा वापर करून फक्त अध्यक्ष पद मिळविण्यासाठी व ज्या काही चौकश्या लागलेले आहेत त्या थांबवण्यासाठी. शिंदे यांनी हा प्रवेश घेतलेला होता. अशी खळबळजनक टीका यावेळी करण्यात आली. त्यामुळे पहिले पासूनच चंद्रपूर जिल्हा प्रमुखाचे पद देण्यासाठी माझी नाराजी होती असे त्यांनी सांगितले. चंद्रपूर जिल्ह्याच्या नवीन जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी लवकरच सुरू होणार असल्याचे विदर्भ जनसंपर्क प्रमुख प्रशांत कदम यांनी सांगितले आहे. याबाबत विदर्भ प्रमुख वरिष्ठ नेतृत्वाला अहवाल सादर करणार आहेत.  

*वरोरा येथे शिवसेनेच्या नेत्यावर पोस्टर लावल्याबद्दल तीव्र प्रतिक्रिया*  

वरोरा शहरात शिवसेनेच्या नेते राऊत साहेब यांच्यावर टीकात्मक पोस्टर लावण्यात आले होते. यावर प्रतिक्रिया देताना प्रशांत कदम यांनी स्पष्ट केले की, *"विरोधकांना आता कोणतेही काम उरलेले नाही. आमच्या नेतृत्वाचा अपमान सहन केला जाणार नाही. याबाबत वरोरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे. पुढील १५ दिवसात जर पोस्टर लावणाऱ्या व्यक्तीला अटक झाली नाही, तर आनंदवन चौक येथे शिवसेना ‘स्टाईल’ आंदोलन करण्यात येईल."*  

या प्रसंगी उपजिल्हाप्रमुख पंकज नाशिककर यांनीही कदम यांच्या मताला पाठिंबा देत म्हटले आहे की, *"एखाद्याच्या जाण्याने शिवसेना संपत नाही. पुढील काळात पक्ष आपली सत्ता पुन्हा स्थापित करेल."*  

*शिवसेनेची बैठक वरोरा येथे पार*  

वरोरा येथील विश्रामगृहावर शिवसेनेची बैठक विदर्भ जनसंपर्क प्रमुख प्रशांत कदम आणि जिल्हाप्रमुख गिरे यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी शेकडो शिवसैनिक हजर होते. बैठकीत पक्षाच्या भावी रणनीतीवर चर्चा झाली.

या वरोरा येथील विश्रामगृह  येथे झालेल्या बैठकीत संदीप गिरे जिल्हाप्रमुख चंद्रपूर, मनीष जेठानी चंद्रपूर जिल्हा संघटक, दत्ता बोरेकर, वैभव डहाणे विधानसभा समन्वयक, नंदलाल टेंभुर्डे तालुकाप्रमुख वरोरा, नंदू पडाल भद्रावती तालुकाप्रमुख, हेमराज कुरेकर वरोरा शहर प्रमुख, इतर पद अधिकारी व  असंख्य शिवसैनिक उपस्थितीत होते.

Comments