वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

*अज्ञात व्यक्तींनी रवींद्र शिंदे यांच्या फोटोला फासले काळे**भाजपा प्रवेशानंतर त्यांच्याविरुद्ध उफाळून आला असंतोष*

*अज्ञात व्यक्तींनी रवींद्र शिंदे यांच्या फोटोला फासले काळे*

*भाजपा प्रवेशानंतर त्यांच्याविरुद्ध उफाळून आला असंतोष*

वरोडा : श्याम ठेंगडी, वरोरा 
          शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या या कृतीमुळे  शिवसैनिकात असंतोष पसरला आहे. 
        रवींद्र शिंदे यांचे वरोडा येथील शहीद डाहूले स्मारक चौकात शिवालय नामक जनसंपर्क कार्यालय आहे. या कार्यालयाबाहेर भिंतीवर हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य तैलचित्र लावण्यात आले असून त्याच्या बाजूला जिल्हाप्रमुख म्हणून रवींद्र शिंदे यांचाही फोटो आहे. आज 16 जुलै रोज गुरुवारला  सकाळी रवींद्र शिंदे यांच्या फोटोला काळा रंग फासून त्याखाली गद्दार लिहिले असल्याचे निदर्शनास आले. शहरात काल शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख नेमणे असून त्यासाठी दहा ते पंचवीस लाख रुपये द्यावे लागेल. यासाठी राऊत नामक व्यक्तीशी संपर्क करावा अशा आशयाचे वादग्रस्त फलक लावण्यात आले होते. या घटनेची ही प्रतिक्रिया तर नव्हे ना अशी चर्चा सुरू आहे.
        एक मात्र खरे की शहरात झालेल्या या दोन प्रकारच्या घटनेमुळे पुढील काही दिवसात राजकीय वातावरणात मात्र बरीच उलथापालथ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
     जिल्ह्यात अग्रणी असलेल्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदी रवींद्र शिंदे यांची अविरोध निवड झाली होती. ते काँग्रेस प्रणित पॅनल कडून अविरोध निवडून आल्याचे बोलल्या जात असताना आगामी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून रवींद्र शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे त्यांच्याबाबत निर्माण झालेला असंतोष हा उफाळून आलेला आहे. त्याचीच परिणीती त्यांच्या फोटोला काळे फासण्यात झाली असावी अशी चर्चा आहे. रवींद्र शिंदे यांच्या भाजपा प्रवेश नंतर राजकारण मात्र बरेच तापले आहे. 

          काळे फासणाऱ्या अज्ञात व्यक्तींनी  आपली प्रतिक्रिया या कृतीतून व्यक्त केली केल्याचे बोलल्या जात आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून अज्ञात व्यक्ती विरोधात तपास सुरू केल्या असल्याचे कळते.
                फोटोला काळे फासणाऱ्या अज्ञात व्यक्तींची कृती मात्र लोकशाही विरोधी असल्याचे प्रतिक्रिया नागरिकाकडून व्यक्त होत आहे.
या घटनेनंतर कार्यालयाबाहेर भिंतीवर असलेले हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य तैलचित्र काढून त्या ठिकाणी स्वर्गीय श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट च्या विविध योजनांची माहिती देणारे तैलचित्र लावण्यात आले आहे.

Comments