लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

जुन्नर आमदारांवर आदिवासी मंत्र्यांच्या अपमानासाठी गुन्हा दाखल करण्याची मागणी.

जुन्नर आमदारांवर आदिवासी मंत्र्यांच्या अपमानासाठी गुन्हा दाखल करण्याची मागणी. 

कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा रमेश मेश्राम

  
चंद्रपूर, २७ जुलै २०२५**  
चेतन लूतडे 

जुन्नर तालुक्यात झालेल्या एका शासकीय बैठकीत आदिवासी विकास मंत्र्यांना अपशब्द वापरल्याच्या आरोपावरून आमदार शरद सोनवणे यांच्यावर **अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा, १९८९** अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी नेते रमेश मेश्राम यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर केली आहे.  

 घटनाचा आढावा 
दिनांक **२५ जुलै २०२५** रोजी जुन्नर येथील पंचायत समिती सभागृहात शासकीय कामाच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ही बैठक आमदार शरद सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडत असताना, तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, शासकीय अधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. त्या दरम्यान, आमदार सोनवणे यांनी महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री **डॉ. अशोकराव उईके** यांच्यावर टीका करताना **"मुर्ख मंत्री"** आणि **"चोर साला"** असे अपमानास्पद शब्द वापरल्याचा आरोप निवेदनात घेण्यात आला आहे.  

१. मंत्री डॉ. उईके हे **संविधानिक पदधारक** असून, त्यांचा सार्वजनिक अपमान हा **शासनाचा अपमान** समजला जाईल.  
२. डॉ. उईके आदिवासी समुदायाचे प्रतिनिधी असल्याने, त्यांच्या विरुद्ध वापरले गेलेले शब्द **संपूर्ण आदिवासी समाजाचा अवमान** आहेत.  
३. आरोपी आमदारावर **SC/ST अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलमांखाली** तातडीने कारवाई व्हावी.  

रमेश मेश्राम यांनी स्पष्ट केले आहे की, या प्रकरणात लगेच कारवाई झाली नाही तर **आदिवासी संघटनांकडून तीव्र आंदोलन** केले जाईल. अशा परिस्थितीत कोणत्याही अप्रिय घटनेसाठी शासन जबाबदार राहील, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.  
******

आदरणीय लक्ष्मणकाकाजी गमे सर्वाधिकारी, अ.भा. श्रीगुरूदेव सेवा मंडळ, श्रीक्षेत्र गुरूकुंज आश्रम, मोझरी यांनी सीडीसीसी बॅंक चंद्रपूर अध्यक्षपदी निवड झालबद्दल श्री रविंद्र शिंदे यांच्या निवास्थानी भेट देवून सत्कार केला तसेच वंदनीय तुकडोजी महाराज ग्रामगीता भेट करीत आशिर्वाद दिले.

Comments