लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

*राष्ट्रीय खनिज प्रतिष्ठान कार्यशाळेत "पारदर्शकता व अनुपालन" या मुद्द्यांवर चर्चा**चंद्रपूर जिल्ह्यातील कार्पेट प्रकल्पासाठी जिल्हाधिकारी सन्मानित*

*राष्ट्रीय खनिज प्रतिष्ठान कार्यशाळेत "पारदर्शकता व अनुपालन" या मुद्द्यांवर  चर्चा*

*चंद्रपूर जिल्ह्यातील कार्पेट प्रकल्पासाठी  जिल्हाधिकारी सन्मानित*

चंद्रपूर,  दि. 9  : खनिज मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रीय पातळीवरील जिल्हा खनिज प्रतिष्ठान (DMF) कार्यशाळेचे आयोजन  नवी दिल्ली येथे करण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यातील कार्पेट प्रकल्पासाठी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांचा सदर कार्यशाळेत सत्कार करण्यात आला 
या एकदिवसीय कार्यशाळेचा मुख्य उद्देश जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गत विविध राज्यांमध्ये सुरू असलेल्या उपक्रमांचा परस्पर अभ्यास, अधिकाऱ्यांची कार्यक्षमता वाढविणे आणि प्रधानमंत्री खानिज क्षेत्र कल्याण योजना (PMKKKY) च्या प्रभावी अंमलबजावणीस गती देणे हा होता.
कार्यशाळेदरम्यान “पारदर्शकता व अनुपालन” या विषयावर सखोल चर्चा झाली. यात मुख्यतः DMF योजनांच्या अंमलबजावणीत आढळणाऱ्या त्रुटी, संभाव्य धोके तसेच या योजनांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आवश्यक असलेल्या अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजनांची सविस्तर मांडणी करण्यात आली.
चर्चेमधून मिळालेल्या महत्त्वपूर्ण शिफारशींमुळे भविष्यातील धोरणनिर्मितीस दिशा मिळणार असून DMF योजना अधिक प्रभावी, पारदर्शक व लोकाभिमुख करण्यासाठी मार्गदर्शन झाले आहे. या कार्यशाळेत सहभागी अधिकाऱ्यांना विविध राज्यातील यशस्वी उपक्रमांची माहिती घेण्याची संधी मिळाली.
विशेष म्हणजे, या राष्ट्रीय कार्यशाळेत चंद्रपूर जिल्ह्यातील महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारे राबविण्यात येत असलेल्या कार्पेट निर्मिती प्रकल्पाचे स्टॉलही आकर्षणाचे केंद्र ठरले. या उपक्रमाद्वारे स्थानिक महिलांना रोजगार उपलब्ध होत असून त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळत आहे.
सदर कार्यशाळा ही खनिज क्षेत्रातील सामाजिक विकासाची प्रभावी साधने म्हणून DMF च्या भविष्यातील वाटचालीस निश्चितच मार्गदर्शक ठरणार आहे.

Comments