वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

*चंद्रपूरमध्ये आयआयए शाखेचे भव्य उद्घाटन, नवीन कार्यकारिणीने सूत्रे स्वीकारली**

*चंद्रपूरमध्ये आयआयए शाखेचे भव्य उद्घाटन, नवीन कार्यकारिणीने सूत्रे स्वीकारली*

चंद्रपूर 
अंकुश अवथे 

भारतीय वास्तुशिल्प संस्था (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स - आयआयए) चंद्रपूर शाखेची स्थापना स्थानिक एनडी हॉटेलमध्ये आयोजित भव्य कार्यक्रमात करण्यात आली. १९१७ साली स्थापन झालेल्या या राष्ट्रीय संस्थेच्या चंद्रपूर शाखेद्वारे प्रदेशातील वास्तुविशारदांना व्यावसायिक विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे.  

**मान्यवरांची उपस्थिती**  
कार्यक्रमास आयआयए नॅशनल कौन्सिलचे सहसचिव **संदीप बावडेकर**, आयआयए महाराष्ट्रचे अध्यक्ष **संदीप प्रभू**, **सुनील भाले**, **रविराज सरवटे**, महाराष्ट्र चॅप्टरचे कोषाध्यक्ष **शेखर बागोल**, तसेच **उपेंद्र पंडित** आणि **प्रियदर्शन नागपूरकर** सारख्या वास्तुविशारदांनी हजेरी लावली.  

*नवीन कार्यकारिणीची घोषणा*
चंद्रपूर शाखेच्या नव्या कार्यकारिणीत पुढील सदस्य निवडण्यात आले:  
- **अध्यक्ष** : वैभव सहारकर  
- **उपाध्यक्ष** : सचिन चिंतावार  
- **सचिव** : वसीम शेख  
- **कोषाध्यक्ष** : परिणीता मेश्राम  
- **कार्यकारिणी सदस्य** : रवी पचारे, आनंद मुंधडा, तेजस काळसकर, स्पर्श कालडा, दिलीप जांगीड, शिल्पा हसानी, शिवानी निंबाळकर  

*विशेष सत्कार**  
चंद्रपूर जिल्ह्यातील पहिल्या महिला आर्किटेक्ट **बजाज मॅडम** यांना तसेच वास्तुक्षेत्रातील वरिष्ठ व्यावसायिक **घनश्याम मुंधडा**, **राजेश रंगारी** आणि **बापू धोटे** यांचा सत्कार करण्यात आला.  

 **उद्देश आणि भविष्यातील योजना**  
नव्या शाखेद्वारे वास्तुकला क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान, सर्जनशीलता आणि व्यावसायिक दर्जा उंचावण्यासाठी विविध कार्यशाळा, परिसंवाद आणि प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. अध्यक्ष **वैभव सहारकर** यांनी शाखेच्या भविष्यातील कार्यक्रमांसाठी सर्व सहभागींना एकत्र येण्याचे आवाहन केले.  

हा कार्यक्रम चंद्रपूरमधील वास्तुविशारद समुदायासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  



Comments