वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

"देव तारी त्याला कोण मारी"

"देव तारी त्याला कोण मारी"

 : "देव तारी त्याला कोण मारी" या म्हणीचा प्रत्येक अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघातातून आला आहे. एअर इंडियाच्या विमानात 242 प्रवाशी प्रवास करत होते. ८ टँकर भरतील इतकं इंधन घेऊन उड्डाण केलं आणि विमान क्रॅश झालं. भयानक झालेल्या स्फोटामध्ये 241 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पण या भयानक दुर्घटनेमध्ये एक प्रवाशी आश्चर्यकारक बचावला. या भयानक अपघातातून वाचण्याचं कारणही समोर आलं आहे.
अहमदाबाद विमानतळारून टेकऑफ केल्यानंतर अवघ्या १६ किमी अंतरावर एअर इंडियाचं लंडनला जाणारं विमान कोसळलं. हे विमान बीजे मेडिकल कॉलेजच्या कँटीनवर कोसळलं. हा अपघात इतका भीषण होता की, अवघ्या ३५ सेकंदामध्ये भीषण असा स्फोट झाला. या स्फोटात विमानातील आणि कँटिनमधील भावी डॉक्टरांचा मृत्यू झाला. विमानातील २४१ आणि कँटिनमधील २० ते २५ जणांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना जेव्हा घडली तेव्हा विमानात प्रवास करणारा विश्वास कुमार नावाचा तरुण सुखरूप बचावला.


विश्वास कुमार रमेश असं या प्रवाशाचं नाव असून ते 40 वर्षांचे आहेत. विश्वास कुमार रमेश हे ब्रिटीश नागरिक असून मागच्या काही दिवसांपासून ते कुटुंबाला भेटण्यासाठी त्यांचा भाऊ अजय कुमार रमेश (वय 45) यांच्यासोबत भारतात आले होते. भेटीगाठी झाल्यानंतर लंडनला चालले होते. एअर इंडियाच्या या विमानात सीट नंबर 11 A  वर ते बसले होते.  पण 'टेक ऑफच्या 30 सेकंदांनंतर विमानातून मोठा आवाज आला आणि विमान कोसळलं. काही कळायच्या आतमध्येच सगळं घडलं', अशी प्रतिक्रिया विश्वास यांनी दिली. विमान अपघातामध्ये विश्वास यांची छाती, डोळे आणि पायाला दुखापत झाली आहे.

विश्वास या दुर्घटनेतून बचावले याबद्दल सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. पण, त्यांच्या बचावण्याचं कारणही चमत्कारापेक्षा कमी नाही. त्यांचं सीट हे 11 A होतं. 11 A सीट हे विमानात इकोनॉमी क्लासचं होतं. त्याची बसण्याची जागा ही एक्झिट दाराजवळ होती.

असं गृहीत धरलं जातंय की, विमान जेव्हा कोसळलं तेव्हा त्यांनी कमी उंचीवर एक्झिट दार उघडलं असेल आणि बाहेर उडी मारली असेल. पण हे त्यांनी अवघ्या ३० सेकंदात करून स्वत: चा जीव वाचवला, याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

मी जेव्हा उठलो तेव्हा माझ्या आजूबाजूला मृतदेहांचा खच पडला होता. मी बराच घाबरलो आणि तिथून पळायला लागलो. माझ्या बाजूला विमानाचे तुकडे पडले होते. मला कुणीतरी पकडलं आणि ऍम्ब्युलन्समध्ये टाकून रुग्णालयात आणलं', असं विश्वास यांनी सांगितलं. मागच्या 20 वर्षांपासून विश्वास लंडनमध्ये राहत आहेत, विश्वास यांची पत्नी आणि मुलगाही लंडनमध्येच आहेत.



Comments