वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत शिबिरांचे आयोजन* *आदिवासी बांधवांनी लाभ घेण्याचे आवाहन*

*धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत शिबिरांचे आयोजन* 

*आदिवासी बांधवांनी लाभ घेण्याचे आवाहन*

चंद्रपूर, दि. 8 जून : जनजातीय गौरव वर्षानिमित्त भारत सरकारने 'प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान' (PM-JANMAN) आणि 'धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान' (DA-JGUA) अंतर्गत आदिवासी समुदायांना सक्षम करण्यासाठी दोन महत्त्वपूर्ण आणि कालबध्द कार्यक्रम हाती घेतले आहेत. एकत्रित प्रयत्नांचा भाग म्हणून 'धरती आबा अभियान – एक केंद्रित जागरूकता आणि संपृक्तता मोहीम' तसेच 'धरती आबा कर्मयोगी - एक क्षमता बांधणी' कार्यक्रम या दोन हस्तक्षेपांद्वारे लक्षित बहु-क्षेत्रीय सेवा वितरणासाठी एक मोठी मोहीम आखलेली आहे. आदिवासी भागांमध्ये सेवा आणि पायाभूत सुविधांची परिपूर्णता सुनिश्चित करणे या उपक्रमांचा उद्देश आहे.

जनजातीय गौरव वर्ष (JJGV) 2025 चा भाग म्हणून शेवटच्या घटकापर्यंतच्या आदिवासी समुदायांना वैयक्तिक लाभांची घरपोच सेवा देण्यासाठी केंद्र सरकारच्या देशव्यापी मोहीमेअंतर्गत गाव- आणि क्लस्टरस्तरीय शिबिरांचे आयोजन केले आहे. यासाठी प्रत्यक्ष ग्रामस्तरावर आधारकार्ड, रेशनकार्ड, आयुष्मान भारतकार्ड (PM-JAY), जातीचे प्रमाणपत्र, पीएम-किसान, जनधनखाते काढणे अशा सेवा देण्यात येणार आहेत. ही शिबिरे स्थानिक प्रशासन, फ्रंटलाइन कर्मचारी आणि विविध शासकीय विभागांच्या सेवांचे अभिसरण यांच्या सक्रिय सहभागातून चालतील. पात्र आदिवासी व्यक्ती आणि कुटुंबापर्यंत लाभ पोहोचविणे हा या शिबिरांचा उद्देश आहे. 

या शिबिरांचे आयोजन  15 ते  30 जून 2025 या कालावधीत केले जात आहे. त्याअनुषंगाने राजूरा तालुक्यामध्ये 16 ते  25 जून पर्यत  मंगी बु., सिर्सी, येरगव्हाण, भुरकुंडा खु. जामणी येथे. कोरपणा तालुक्यामध्ये 16  ते 26 जून पर्यत रुपापेठ, धानोली, खेरगाव, सावलहीरा, धामनगाव येथे. जिवती तालुक्यामध्ये  17 ते 27 जूनपर्यत नगराळा, जिवती, भारी, पाटण, येल्लापुर, कुंभेझरी, नोकेवाडा. मुल  तालुक्यामध्ये 17 ते 27 जूनपर्यत मुरमाळी, चिखली, आकापुर, जानाळा, भवराळा. पोंभुर्णा तालुक्यामध्ये 16 ते  24 जूनपर्यत थेरगाव, देवई, भटाळी, केमारा, चिंतलधाबा क्र.1 व 2. सावली तालुक्यामध्ये 17 ते 20 जूनपर्यत  बोरमाळा, चारगाव. सिंदेवाही तालुक्यामध्ये 17 ते 27 जूनपर्यत कारव्हा, नाचनभटी, सिरकाडा, मोहाळी, कळमगाव गन्ना, सरडपार. चंद्रपुर तालुक्यामध्ये 19 जूनला लोहारा येथे. बल्लारपुर तालुक्यामध्ये 23 जूनला कवडजई, गोंडपिपरी तालुक्यामध्ये 24 जूनला धानापुर येथे कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरांतून मोठया प्रमाणात आदिवासी नागरीकांना विविध सेवांचा लाभ मिळणार आहे.

*जिल्हाधिकारी विनय गौडा यांचे आवाहन* :
15 ते 30 जून 2025 दरम्यान होणा-या शिबिरांना आदिवासी बांधवांनी मोठया संख्येने उपस्थित राहुन आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे काढून घ्यावीत, असे आवाहन  जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले आहे.

Comments