वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांचे चौकशी पधक दाखल.सत्ताधारी व विरोधी संचालकांमध्ये वाद पेटण्याची शक्यता


कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांचे चौकशी पधक दाखल.

सत्ताधारी व विरोधी संचालकांमध्ये वाद पेटण्याची शक्यता

वरोरा :
चेतन लूतडे 

शुक्रवारी सहा तारखेला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी व ऑडिट रिपोर्ट तपासण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे एक पथक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात दाखल झाले होते.

या पूर्वी कार्यरत असणारे शिरीष गोडे ऑडिटरने दोनदा ऑडिट केले असल्याची तक्रार करण्यात आली. या तक्रारीवरून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सचिवाकडे या ऑडिट रिपोर्टचा तपास करण्यासाठी हे पथक आल्याचे सचिव चंद्रसेन शिंदे व सदस्यांनी यांनी सांगितले. यावेळी कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना हजर राहण्याचे आदेश दिले होते. दिवसभर ही चौकशी चालल्या नंतर सगळा अहवाल वर रिपोर्ट कॉपीज अधिकाऱ्यांनी आपल्या सोबत नेली असल्याचे समजते. 

यानंतर आमच्या प्रतिनिधींनी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यामध्ये  भद्रावतीचे सहाय्यक निबंधक बोधड  यांच्या नेतृत्वात दोन सहाय्यक घेऊन ही कमिटी कार्यालयात आल्याचे कळले.  भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ही डिपार्टमेंटल कारवाई असून तुम्हाला सांगण्याची गरज नाही. अशी उत्तर प्राप्त झाल्याने. या प्रकरणातील गांभीर्य लक्षात आले. 
नुकतेच कांदा अनुदान घोटाळा प्रकरण, तारण घोटाळा, विरोधी पक्षाने दिलेल्या वारंवार तक्रारी.सचिवावर मनमानी कारभार व अनियमितेचा ठपका ठेवत ११ विद्यमान संचालकांनी ५ जून रोजी जिल्हा उपनिबंधक चंद्रपूर यांच्याकडे तक्रार केली.  या सगळ्या प्रकरणामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. 

तसेच सभेमध्ये जे विषय घेतले जातात, त्यावर ठराव होऊनही प्रोसिडिंग लिहिताना मात्र ते जाणीवपूर्वक बदलल्या जात आहे. यात दोषी असलेले सचिव व सभापतीवर कारवाई करावी, अशी मागणी तक्रारीतून केली असल्याचे बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र चिकटे, संचालक नितीन मत्ते यांनी सांगितले. यावेळी बाजार समितीचे संचालक दिनेश कष्टी, हरिदास जाधव, गणेश चवले आदी संचालक उपस्थित होते.

अशा बऱ्याच तक्रारीमुळे ही समिती दाखल झाल्याचे विरोधी गटाचे म्हणणे आहे. त्यामुळे जिल्हा उपनिबंधक या तक्रारीवर काय दखल घेते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Comments