वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

शेगावमध्ये डॉक्टरवर अश्लील प्रस्ताव आणि छळाचा आरोप – पोलिसांनी गुन्हा नोंदवला*

*शेगावमध्ये डॉक्टरवर अश्लील प्रस्ताव आणि छळाचा आरोप – पोलिसांनी गुन्हा नोंदवला*  

वरोरा 
प्रतिनिधी 

एका महिलेने तालुक्यातील शेगाव येथील ताजणे हॉस्पिटलच्या डॉक्टर वर अश्लील प्रस्ताव आणि मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे. महिलेने शेगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवून डॉक्टर विरुद्ध कायदेशीर कारवाईची करण्याची मागणी केली आहे.  

 *घटनेचा तपशील:*  
तक्रारीनुसार, महिला  सध्या शेगाव येथे तिच्या पतीसोबत राहते आणि *ताजणे हॉस्पिटल*मध्ये स्टाफ म्हणून काम करते. ती वरोरा येथील *प्रख्यात  कॉलेज*मध्ये १४वीच्या शिक्षण घेत  आहे.तिच्या म्हणण्यानुसार,  १९ जून २०२५ रोजी हॉस्पिटलमध्ये काम सुरू केल्यानंतर डॉ. ताजणे यांनी तिला  सफाई करने, झाडांना पाणी घालणे, फर्निचर पुसणे यासह *"Sex By Me"* अशा अश्लील मागणीसह एक चिठ्ठी दिली. जेव्हा महिलेने हा प्रस्ताव नाकारला, तेव्हा डॉक्टरने तिला पुन्हा पुन्हा दबाव आणि फोनवर  त्रास देत असल्याचा आरोप महिला कर्मचाऱ्यांनी केला आहे .

 *पतीला कळवलं, पोलिसांकडे धाव घेतली:*  
महिलेने ही घटना तिच्या पतीला कळवली आणि नंतर शेगाव पोलीस स्टेशनमध्ये तोंडी तक्रार नोंदवली. तिच्या तक्रारीनुसार, डॉ. ताजणे यांनी तिच्या नकारामुळे तिला कामावर येणे बंद केल्याचे सांगितले आणि फोनवर मानसिक त्रास देत *"शरीरसुखाची मागणी"* सुरू ठेवल्याचा आरोप केलेला आहे.

 पोलिसांनी डॉ. ताजणे विरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 नूसार 75(1) नूसार गुन्हा शेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत नोंद केला असून पुढील कारवाई पोलीस करीत आहे. तथापि, महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमुळे ही बाब समाजमाध्यमांवर चर्चेचा विषय बनली आहे.

 

Comments