वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

*जिल्हाधिका-यांकडून अन्न व औषध प्रशासन विभागाचा आढावा* *नियमित तपासणी करण्याच्या सुचना*


*जिल्हाधिका-यांकडून अन्न व औषध प्रशासन विभागाचा आढावा*

 *नियमित तपासणी करण्याच्या सुचना*

चंद्रपूर, दि. 14 जून : अन्न सुरक्षा मानदे कायदा – 2006 ची प्रभावी अंमलबजावणी, नियंत्रण व समस्यांचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय सल्लागार समितीचे गठण करण्यात आले आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी शुक्रवारी अन्न व औषध प्रशासन विभागाचा आढावा घेऊन नियमित तपासणी करण्याच्या सुचना दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त प्रवीण उमप, पोलिस उपअधिक्षक (गृह) योगेश्वर पारधी, उपसंचालक (कृषी) चंद्रकांत ठाकरे, जिल्हा उद्योग केंद्राचे पी.के. खरमाटे, शिक्षण विभागाच्या अर्चना मासीरकर, अन्न पदार्थ व्यावसायिक प्रतिनिधी प्रशांत चिटनुरवार आदी उपस्थित होते. 

यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, बाजारात विक्रीकरीता असणा-या अन्न पदार्थांमध्ये कोणत्याही भेसळ होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच दुकानांची / आस्थापनांची नियमित तपासणी करावी. भेसळ करणा-यांवर गुन्हे दाखल करून कडक कारवाई करावी. बाजारातील अन्न पदार्थांबाबत ग्राहकांमध्ये जनजागृती करावी. सुगंधी गुटखा, प्रतिबंधित पदार्थांची वाहतूक, साठवणूक व विक्री होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी दिल्या. यावेळी सहाय्यक आयुक्त श्री.  उमप यांनी सादरीकरण केले. 

*येथे करा तक्रार* : याबाबत नागरिकांना तक्रार नोंदवायची असल्यास ‘वंदे मातरम चांदा’ टोल फ्री क्रमांक 1800-233-8691 तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाचा टोल फ्री क्रमांक 1800-222-365, याशिवाय foscos.gov.in या संकेतस्थळावरील  Food Consumer Grievance वर ऑनलाईन तक्रार नोंदविता येते. 
०००००००

Comments