वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

तुकूम येथे भीषण अपघात, आमदार किशोर जोरगेवार यांची घटनास्थळी पाहणी;**जखमींची रुग्णालयात जाऊन भेट*

*तुकूम येथे भीषण अपघात, आमदार किशोर जोरगेवार यांची घटनास्थळी पाहणी;*

*जखमींची रुग्णालयात जाऊन भेट*
 
हायवा चालकाला फिट आल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे वाहनाने रस्त्याकडेला असलेल्या नागरिकांना चिरडले. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून काही नागरिक जखमी झाले आहेत. सानिका कुमरे (वय २२ वर्षे, रा. लक्कडकोट) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ही घटना तुकूम येथे घडली असून, आमदार किशोर जोरगेवार यांनी घटनास्थळी जाऊन घटनेची माहिती घेतली. तसेच रुग्णालयात उपचार घेत असलेल्या काजल आश्राम हिची आमदार किशोर जोरगेवार यांनी भेट घेतली.
मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास हायवा चालक तुकूम परिसरातून जात असताना, चालकाला फिटचा झटका आल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. वाहनाने रस्त्यालगत उभ्या असलेल्या नागरिकांना आणि ऑटोला चिरडले. या घटनेत सानिकाचा जागीच मृत्यू झाला, तर इतर नागरिक जखमी झाले आहेत. यात नंदा उंबरकर (वय ५५, रा. मेजर गेट,) या किरकोड जखमी झाल्या आहेत. तसेच काजल आश्राम (रा. उपरवाही, ता. राजुरा) हिला जास्त इजा झाल्याने तिला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच आमदार किशोर जोरगेवार यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांची उपस्थिती होती. त्यानंतर आमदार किशोर जोरगेवार यांनी खाजगी रुग्णालयात जाऊन उपचार घेत असलेल्या काजल मेश्राम हिची भेट घेतली आणि सुरु असलेल्या उपचाराबाबत डॉक्टरांकडून माहिती घेतली. मृतक आणि जखमी या दोघीही मैत्रीनी असुन त्या पोलिस भरतीच्या तयारी करिता चंद्रपूरात राहत हांत्या. त्या एका खाजगी अभ्यासिकेत अभ्यास करुन घरी जात असतांना सदर घटना घडली आहे.

Comments