वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

*रेतीघाट लिलावाच्या अनुषंगाने अभिप्राय नोंदविण्याचे आवाहन*

*रेतीघाट लिलावाच्या अनुषंगाने अभिप्राय नोंदविण्याचे आवाहन*

चंद्रपूर, दि. 24 : जिल्ह्यातील सन 2025-26 या वर्षाकरीता वाळूगटांच्या राज्यस्तरीय (SEAC व SEIAA) पर्यावरण समितीची अनुमती मिळविण्याकरीता अर्ज सादर करावयाचे आहेत. त्याकरीता जिल्ह्यातील वाळू गट निश्चित करण्यात आले असून उपलब्ध संसाधनाच्या आधारे जिल्हा सर्वेक्षण अहवाल  तयार करण्यात आलेला आहे. केंद्र शासनाच्या पर्यावरण, वने व वातावरण बदल मंत्रालयाने 25 जुलै 2018 मध्ये प्रसिध्द केलेल्या वाळू / रेती उत्खनन मार्गदशक सूचनेनुसार सदर अहवाल जनतेच्या माहितीकरीता व अभिप्राय नोंदविण्याकरीता https://chanda.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

सदर अहवालातील रेती घाटांच्या लिलावाच्या अनुषंगाने आपले अभिप्राय उपरोक्त https://chanda.nic.in संकेतस्थळावर व miningofficer.chanda@gmail.com वर नोंदवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले आहे.

Comments