वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

*वनजमिनीवरील घरांबाबत अफवांना मिळाला पूर्णविराम*


*वनजमिनीवरील घरांबाबत अफवांना मिळाला पूर्णविराम*

*वनजमिनीवरील घरांबाबतची सत्यता स्पष्ट-बैठकीत निर्णय*

*चंद्रपूर, दि. 25:  बल्लारपूर येथील रवींद्र नगर, मौलाना आझाद वॉर्ड, पं. दीनदयाल वॉर्ड व डॉ. राजेंद्र प्रसाद वॉर्डातील नागरिक गेल्या 30-40 वर्षांपासून वास्तव्यास आहेत. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या नावाखाली या भागातील अतिक्रमण हटविण्यात येणार असल्याच्या अफवा काहीजण हेतुपुरस्पर पसरवत आहेत. या अफवांमध्ये कोणतेही तथ्य नाही. नागरिकांच्या हिताचे रक्षण ही माझी नैतिक जबाबदारी असून मी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी केले.*

 बल्लारपूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात वनजमिनीवरील घरांबाबतच्या अफवांवर स्पष्टता मिळवण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी ते बोलत होते.

बैठकीला भाजपा जेष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा,अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री. व्यवहारे, उपविभागीय अधिकारी अजय चरडे, भाजपाचे काशीनाथ सिंह, तहसीलदार रेणुका कोकाटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मुकेश टांगले, बल्लारपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल वाघ आदींची उपस्थिती होती.

आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, नागरिकांनी एक एक पैसा जमा करून घरे उभारली आहेत. एका बाजूला शासन बेघरांना घरे देण्याचे कार्य करीत आहे, तर दुसऱ्या बाजूला काहीजण अफवा पसरवून बल्लारपूर येथील चार वॉर्डांतील रहिवाशांना हटविले जाणार असल्याचे चुकीचे चित्र उभे करत आहेत. अनेक नागरिक नझुल, वेकोली तसेच वनविभागाच्या जमिनीवर गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहेत. या नागरिकांना पट्टे देण्यासंदर्भात नियोजन केले जात असून, आतापर्यंत 4,442 प्रॉपर्टीं आयडेंटिफाय करण्यात आल्या आहेत. येणाऱ्या काळात येथील नागरिकांना पट्टे देण्याची प्रक्रिया राबविण्यात येईल. या संदर्भातील मागणी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्रजी यादव यांच्यासमोरही मांडण्यात येईल.

अफवा पसरवून नागरिकांमध्ये भीती निर्माण करणे चुकीचे असून, कोणीही अशा अफवांवर विश्वास ठेवू नये,” असे स्पष्ट शब्दांत आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित नागरिकांना यावेळी सांगितले.
============================

*आदिवासी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य व्यक्ती / संस्थेकडून अर्ज आमंत्रित*

*Ø अंतिम दिनांक 4 जुलै 2025 पर्यंत*

चंद्रपूर, दि. 26 : आदिवासी कल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती किंवा सामाजिक संस्थांना प्रोत्साहन देणे व त्यांच्या कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने आदिवासी विकास विभागामार्फत ‘भगवान बिरसा मुंडा आदिवासी भूषण पुरस्कार’ व ‘भगवान बिरसा मुंडा आदिवासी भूषण संस्था पुरस्कार’ देण्यात येणार आहे. चंद्रपूर प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रातील चंद्रपुर, बल्लारपुर, राजुरा, गोंडपिपरी, कोरपना, जिवती, मुल, सावली, सिंदेवाही, पोंभुर्णा या तालुक्यातील आदिवासी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती तसेच सामाजिक संस्था यांच्याकडून 2023-24 व 2024-25 या वर्षाकरिता प्रस्ताव आमंत्रित आहेत.

सदर प्रस्ताव 4 जुलै 2025 पर्यंत प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपुर येथे स्विकारण्यात येतील. विनामुल्य प्रस्तावाचा नमुना व आवश्यक सर्व माहितीसाठी कृपया प्रकल्प कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी केले आहे.

००००००

Comments