वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

दिवंगत खासदार बाळुभाऊ धानोरकर यांचा द्वितीय पुण्यस्मरण सोहळा आणि अभिवादन कार्यक्रम आयोजित

उजाळा भाऊंच्या आठवणींचा..
*दिवंगत खासदार बाळुभाऊ धानोरकर यांचा द्वितीय पुण्यस्मरण सोहळा आणि अभिवादन कार्यक्रम आयोजित* 

वरोरा, 1/6/25
चेतन लूतडे 

— दिवंगत खासदार बाळुभाऊ धानोरकर यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त मित्र-परिवार व राजकीय सहयोगींनी श्रद्धांजली अर्पण करत  अभिवादन कार्यक्रम बाळू भाऊ मित्र परिवारातर्फे शगुन हॉल, वरोरा येथे आयोजित केला. यावेळी बाळुभाऊंच्या समाजसेवा, लोकहितार्थ केलेल्या कार्यांवर प्रकाश टाकण्यात आला तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला.  
नेतृत्व आणि समाजसेवेचा आदर्श
कार्यक्रमात उपस्थित नेत्यांनी बाळुभाऊंच्या कणखर राजकीय भूमिका, शेतकरी-कामगार हिताच्या चळवळी, किन्नर समाजासाठी उठवलेला प्रश्न, आदिवासी समुदायाच्या  सन्मानासाठी उचललेला आवाज . त्यांच्या अचल निष्ठा, संसदेतील सक्रिय सहभाग आणि सामान्य माणसाच्या समस्यांसाठी लढ्याची जिद्द यांचे उदाहरण म्हणून त्यांच्या कार्याचा उल्लेख उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून केला. 

 *पक्षश्रेष्ठींच्या श्रद्धांजली* 
काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेते आणि सहकारी यांनी बाळुभाऊंच्या निधनाने निर्माण झालेली राजकीय पोकळी पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांच्या पत्नी खासदार **प्रतिभाताई धानोरकर** यांच्यावर सोपवली आहे. त्यांच्या अपुरे स्वप्नांना पूर्णत्वाची प्रेरणा पुढील पिढीपर्यंत पोहोचावी, मानस आणि पार्थ धानोरकर पुत्रांनी सुद्धा वडिलांचे विचार समोर न्यावेत अशी इच्छा मित्र परिवाराने व्यक्त केली.
*उपस्थित नेते *
कार्यक्रमाचे अध्यक्षपद *श्री. नाना पटोले* यांनी भूषवले तर *खा. नामदेवराव किरसान, आ. सुधाकर अडबाले, आ. सुधिरभाऊ मुनगंटीवार, आ. अभिजीत वंजारी, आ. किर्तीकुमार भांगडीया, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माजी आमदार वामनराव कासावार, संजय धोटे, विश्वासजी नांदेकर* शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हाध्यक्ष चंद्रपूर ,रवींद्र शिंदे, मनसे जिल्हाध्यक्ष मंदीप रोडे , राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे राजेंद्र वैद्य यांसारख्या बहुआयामी नेतृत्वाने सहभागी होऊन धानोरकर कुटुंबाला एकत्रित आधार दर्शविला.  
यानिमित्ताने ऑटोचालक कामगारांना पाच कोटी रुपयांचा विमा मान्यवरांचे हस्ते वाटप करण्यात आला. वरोरा भद्रवती शहरातील आटोचालक कामगारांना एक वर्षासाठी हा विमा देण्यात आला यासाठी पक्षाचे नेते शुभम चिमूरकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

 श्रद्धांजली
कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांनी बाळुभाऊंच्या तैलचित्रापुढे पुष्पांजली वाहून त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कार्यकर्त्यांनी संकल्प व्यक्त केला. त्यांच्या विचारांचा प्रसार आणि समाजकारणातील त्यांचे आदर्श टिकून राहावेत, अशी इच्छा सर्वांनी व्यक्त केली. यावेळी कार्यक्रमाचे संचालन डॉ. प्रा. प्रशांत खुळे आणि आभार  प्रवीणजी काकडे यांनी केले.
----***

Comments