वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

*आणीबाणी विरोधातील संघर्ष लढ्याचे छायाचित्र प्रदर्शन**Ø जिल्हाधिका-यांच्या हस्ते उद्घाटन**Ø प्रशासकीय इमारत येथे 25 ते 28 जून पर्यंत नागरिकांसाठी खुले*

*आणीबाणी विरोधातील संघर्ष लढ्याचे छायाचित्र प्रदर्शन*

*जिल्हाधिका-यांच्या हस्ते उद्घाटन*

*प्रशासकीय इमारत येथे 25 ते 28 जून पर्यंत नागरिकांसाठी खुले*

चंद्रपूर, दि. 25 : तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी  25 जून 1975 रोजी देशात आणीबाणी जाहीर केली होती. या घटनेला आज 50 वर्षे पूर्ण होत आहे. त्याचे आौचित्य साधून केंद्र आणि राज्य सरकारच्या सुचनेनुसार आणीबाणी विरोधातील संघर्ष लढ्याचे नागरिकांना अवलोकन व्हावे, या उद्देशाने जिल्हा प्रशासन आणि जिल्हा माहिती कार्यालय, चंद्रपूरच्या वतीने चार दिवसांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

सदर प्रदर्शन प्रशासकीय इमारतीमध्ये दि. 25 ते 28 जूनपर्यंत कार्यालयीन वेळेत नागरिकांसाठी खुले राहणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार,  जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर आदी उपस्थित होते.

*प्रदर्शनामध्ये समाविष्ट बाबी :* पुरातन काळापासून भारतात सुरू असलेली लोकशाही व्यवस्था, लोकशाही परंपरेनुसार यात असलेला लोकांचा सहभाग व दृष्टीकोण, लोकशाहीचे तत्व, भारतीय परंपरा आणि सामुहिक भागीदारीने चालविण्यात आलेले शासन, ग्रामीण आणि शहरी भागातील जमीन स्तरावरील लोकशाही व्यवस्था, स्वतंत्र भारत आणि लोकशाही प्रणाली, आणीबाणीपूर्व व पश्चात भारतीय समाजव्यवस्था, आणीबाणी लावल्यानंतर प्रसिध्द झालेले राजपत्र, प्रसारमाध्यमांवरील निर्बंध, सरकारच्या विरोधात जनआंदोलन, आणीबाणी संपल्यानंतर लोकशाही मुल्यांच्या रक्षणासाठी उचलण्यात आलेली पाऊले, चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांचा आणीबाणी विरोधातील संघर्ष लढा, आदींचा यात समावेश करण्यात आला आहे.

*आणीबाणीधारकांना प्रमाणपत्राचे वाटप :* आणीबाणीत तुरंगवास भोगलेल्या नागरिकांना जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यात हेमंत वासुदेव डहाके, गिरीश वासुदेवराव अणे, अनिल मधुकर अंदनकर, सुधीर वसंतराव टिकेकर, नारायण कृष्णराव पिंपळापुरे, कृष्णा दत्तात्रय देशपांडे यांचा समावेश होता.

००००००

Comments