वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने भद्रावती येथे समाजहितासाठी उपक्रम राबविले.


शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने
समाजहितासाठी उपक्रम राबविले.

भद्रावती, ११ मे २०२५
चेतन लूतडे

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)* आणि *स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट, चंद्रपूर* यांच्या संयुक्त विद्यमाने भद्रावतीत समाजकल्याणकारी उपक्रमांना चालना देण्यात आली . समाज उपयोगी कार्याच्या उद्घाटनाप्रसंगी ह.भ.प. केशवानंद मेश्राम महाराज , प्रा. धनराज आस्वले, उद्धव बाळासाहेब शिवसेना पक्षाचे चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे , रुग्णसेवक पंकज कातोरे यांच्यासह बरेच शिवसैनिक व चैतन्य नगरचे रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
. चैतन्य नगर (गौतम नगर) येथे बोरवेल प्रदान
-"विदेही सदगुरु श्री संत जगन्नाथ महाराज जनजागृती व प्रबोधन योजना"* अंतर्गत, स्व. श्रीनिवासराव (बाबासाहेब) शिंदे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ चैतन्य नगर, भद्रावती येथील नागरिकांच्या पाण्याच्या गरजेला भागवण्यासाठी बोरवेल बांधण्यात आली. यामुळे रहिवाशांच्या दैनंदिन गरजा पूर्ण होण्यास मदत होईल.  
. दिव्यांग युवकाला तीनचाकी सायकल वाटप  
-"हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे दिव्यांग योजना"* अंतर्गत, भद्रावती तालुक्यातील माजरी गावच्या दिव्यांग युवक *मंगेश लांडगे* यांना स्वयंचलित तीनचाकी सायकल देऊन त्यांच्या सहलीस व सवलतीस मदत करण्यात आली.  
**उद्घाटन व हस्ते**  
या कार्यक्रमात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)चे कार्यकर्ते, ट्रस्टचे प्रतिनिधी आणि स्थानिक नागरीक उपस्थित होते. यावेळी शिवसेना नेत्यांनी *"समाजातील दुर्बल घटकांसाठी पाठिंबा देणे हे आमचे कर्तव्य आहे"* असे संदेश दिले.  


सदर बोरवेलचे भुमीपुजन सोहळ्याला ह.भ.प. केशवानंद मेश्राम महाराज, ट्रस्टचे संस्थापक सदस्य तथा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे चंद्रपूर जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे, ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले, ट्रस्टच्या कोषाध्यक्ष श्रीमती सुषमाताई शिंदे, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) भद्रावती तालुका प्रमुख नंदू पढाल, शहर प्रमुख घनश्याम आस्वले, युवा सेना जिल्हा प्रमुख रोहन खुटेमाटे, विश्वास कोंगरे, ज्येष्ठ शिवसैनिक तथा उपशहर प्रमुख हनु पारधे, उत्तम मुजुमदार, रुग्णसेवक पंकज कातोरे, ग्राहक मंच चे पुरुषोत्तम मते, माजी नगरसेवक विनोद वानखेडे, सामाजिक कार्यकर्ते संजय उमरे व परिसरातील प्रतिष्ठित नागरिक व नगरवासी उपस्थित होते.
यावेळी भक्तिमय वातावरणात भजन, पूजन व प्रार्थना पार पडली. मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
**📰 संपर्क:**  
रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट, चंद्रपूर  
शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) भद्रावती प्रभाग  
स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट, चंद्रपुर, ओम चैतन्य सतसंग सेवा मंडळ, चैतन्य नगर, भद्रावती यांचा  उपक्रम

Comments