वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

भारतीय महिला व्हॉलीबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक निलेश मत्ते यांचा सत्कार


भारतीय महिला व्हॉलीबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक निलेश मत्ते यांचा सत्कार 

वरोरा 
चेतन लूतडे 


वरोरा स्फूर्ती स्पोर्टिंग क्लब वरोराचे खेळाडू निलेश अरविंद मते यांची भारतीय महिला व्हॉलीबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी नियुक्ती झाल्याबद्दल स्फूर्ती स्पोर्टिंग क्लब च्या वतीने त्यांचा सहपत्नी सत्कार करण्यात आला. 
निलेश अरविंद मत्ते स्फूर्ती स्पोर्टिंग क्लब वरोराचे खेळाडू प्रशिक्षक व पदाधिकारी या जबाबदाऱ्या सांभाळल्यानंतर ते व्हॉलीबॉल खेळाडू म्हणून नागपूर येथील महालेखाकार कार्यालयात वरिष्ठ लेखाधिकारी म्हणून कार्यरत आहेत त्यांची भारतीय महिला व्हॉलीबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी नियुक्ती झाली होती .वरोरा वासियांसाठी मोठी अभिमानाची बाब ठरली भारतीय महिला व्हॉलीबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक निलेश अरविंद मते व त्यांच्या पत्नी रूपाली मत्ते यांचा स्फूर्ती स्पोर्टिंग क्लब च्या वतीने स्फूर्ती स्पोर्टिंग क्लबचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर आर आर महाजन यांच्या अध्यक्षतेखाली सत्कार करण्यात आला.
      यावेळी मंचावर स्फूर्ती स्पोर्टिंग क्लबचे सचिव सुनील जवदंड उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापकप्रयाग ठाकरे यांनी केले तर उपस्थिताचे आभार स्फूर्ती स्पोर्टिंग क्लबचे ज्येष्ठ पदाधिकारी प्रवीण खिरटकर यांनी मानले यावेळी स्फूर्ती स्पोर्टिंग क्लबचे खेळाडू पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. भारतीय महिला व्हॉलीबॉल संघाची सराव शिबिर गांधीनगर गुजरात मध्ये असून व्हीएतनाम या देशात आयोजित आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेत भारतीय महिला व्हॉलीबॉल संघ मुख्य प्रशिक्षक निलेश मते यांच्या मार्गदर्शनात सहभागी होणार आहे.
निलेश मत्ते
भारतीय व्हॉलीबॉल मंडळाच्या प्रशिक्षकाच्या संदर्भातील दोन परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर भारतीय प्रशिक्षक मंडळातर्फे निवड करण्यात आली असून व्हिएतनाम येथे भारतीय महिला संघ चांगले प्रदर्शन करतील अशी आशा आहे. त्याचप्रमाणे  भविष्यात भारतीय ओलंपिक व्हॉलीबॉल खेळा मध्ये मानाचे स्थान मिळवण्याचा प्रयत्न महिला संघ करतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

वरोरा भद्रावती विधानसभेचे आमदार करण देवतळे यांनी भारतीय व्हॉलीबॉल प्रशिक्षक निलेश मत्ते यांचे अभिनंदन केले आहे.

Comments