वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

संस्कार भारती पब्लिक स्कूल वरोरा सीबीएससी बोर्ड मध्ये विद्यार्थ्यांचे घवघवीत यश 100 टक्के निकाल



संस्कार भारती पब्लिक स्कूल वरोरा सीबीएससी बोर्ड मध्ये विद्यार्थ्यांचे घवघवीत यश 100 टक्के  निकाल       
                             
वरोरा 

 स्थानिक वरोरा येथील संस्कार भारती पब्लिक चा दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा 100 टक्के निकाल लागला यामध्ये सार्थक मिलमिले 97.20  क्रांतदर्शी डांगरे 96.45 शर्वरी डोंगरवार 94.80सौंदर्या मून 94.80 कौस्तुभ कावटी 93.80 तनिष श्रीरंग 91.80 ओजस निखाडे 90.60 इशिका नन्नावरे 90.20  तसेच विशेष म्हणजे सार्थक अभ्यासासोबत व्हॉलिबॉल, चेस, कॅरम, या स्पर्धेत प्रावीण्य प्राप्त केले असुन उत्कृष्ट बासरी वादक, शाळेचा हेड बॉय शिस्तप्रिय सर्वगुण त्यात अंगी आहे क्रांतदर्शी डांगरे यांनी हिंदी या विषयांमध्ये 100 गुण प्राप्त केले सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शाळेचे अध्यक्ष मा.श्री मानकचंद मालू          अकाडमीक कॉर्डिनेटर मा.श्री अनिल डोंगरे, सचिव मा.सुरेश मालू प्राचार्य मा. श्री अनुराग  मसीह तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Comments