वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

श्री झूलेलाल देवजी जयंती मोठ्या उत्साहात संपन्न:-

श्री झूलेलाल देवजी जयंती मोठ्या उत्साहात संपन्न:-
  
वरोरा :-
                  शहरात सकल सिंधी समाज बांधवांनी 30 मार्च रविवार रोजी श्री झुलाल जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. कार्यक्रमाला विशेष मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली.
                29 मार्च रोजी सायंकाळी संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते आणि मध्यरात्रीनंतर केक कापून व फटाके फोडून श्री झूलेलाल देवजी यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
            30मार्च  रोजी श्री झूलेलाल देवजी जन्मोत्सव निमित्त,सकाळी सात ते दहा वाजेपर्यंत स्वच्छता अभियान राबविण्यात आले आणि त्यानंतर आंबेडकर चौक येथे गुढीपाडवा सणा निमित्त समाजातर्फे शरबतचे वाटप करण्यात आले. दुपारी दोन ते पाच वाजेपर्यंत पूजा अर्चना करण्यात आली व नंतर श्री झूलेलाल देवजी यांची रॅली काढण्यात आली. सायंकाळी लंगर (महाप्रसाद) चे कार्यक्रम  यशस्वी रित्या सम्पन्न झाले. कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता सिंधी समाज बांधवांनी अथक परिश्रम घेतले.

Comments