लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

शालेय राज्यस्तरीय बुडो मार्शल आर्ट स्पर्धा संपन्न*

*शालेय राज्यस्तरीय बुडो मार्शल आर्ट स्पर्धा संपन्न*

चंद्रपूर, दि. 2 एप्रिल : क्रीडा व युवक सेवा संचानालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने घुघुस येथे राज्यस्तरीय बुडो मार्शल स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. या स्पर्धेत मुंबई, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर या विभागातून जवळपास 100 विद्यार्थी सहभागी झाले. या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कलेचे प्रदर्शन करून प्रथम स्थान प्राप्त केले व आपल्या विभागाचे नाव राज्यस्तरावर पोहचविले.

स्पर्धेचे उ‌द्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी डॉ. रामेश बोरकुटे तर प्रमुख अतिथी म्हणून क्रीडा अधिकारी मोरेश्वर गायकवाड, घुग्घुसचे सहा. पोलीस निरीक्षक योगेश पाटील, राज्य क्रीडा मार्गदर्शक विजय ढोबळे, बुडो मार्शल आर्टचे सिहान लहू पारवे, विवेक बोढे, सोमेश्वर येलचलवार, विनय बोढे, एलिजा बोरकुटे  आदी उपस्थित होते.

पंच म्हणून स्पर्धेला लहू पारवे, प्रवीण घुगे, सुरेश जाधव, सचिन पट्टेकर, अभिजित हरपळे, संतोष कुलकर्णी, शैलेश मोटघरे, राजेंद्र जंजाळे, अमोल युवनाते, प्राजक्ता सोनवणे, विशाल चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. या स्पर्धेत विपुल नेमराज कावडकर प्रथम, आदित्य संदीप पाटील द्वितीय तर जीत निलेश भोईर यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. स्पर्धेचे मुख्य आयोजक तथा बुडो मार्शल आर्टच्या जिल्हा प्रमुख ज्योती मानुसमारे यांनी स्पर्धेचे आयोजन केले. कोषाध्यक्ष राहुल गौरकार, सह सचिव सुबोध आलेवार यांनी स्पर्धा यशस्वी करण्याकरिता सहकार्य केले.

००००००

Comments