वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

पिजदुरा- भटाळा रस्त्यावरील पुलाला जीवघेणे भगदाड संबंधित विभागाचे दुर्लक्ष

पिजदुरा- भटाळा रस्त्यावरील पुलाला जीवघेणे  भगदाड 

संबंधित विभागाचे दुर्लक्ष
वरोरा 
चेतन लूतडे 

वरोरा तालुक्यातील पिजदूरा- भटाळा रस्त्यावरील फुलाला भले मोठे भगदाड पडले आहे.  मागील दोन वर्षांपासून पिजदुरा- भटाळा रस्त्यावरील नाल्यावर बांधकाम केलेल्या पुलाला भगदाड पडले आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभाग वरोरा यांना लेखी पत्र दिले मात्र सदर रस्त्याला नंबर नसल्यामुळे संबंधित विभागाने हा मार्ग आमच्याकडे येत नसल्यामुळे तक्रार करताना लेखी पत्र दिली आहे. त्यामुळे आज पर्यंत भगदाड पडलेल्या पुलाचे दुरुस्ती करण्यात आलेले नाही, हा मार्ग दोन्हीही पुरातन विभागाशी  संलग्न असलेल्या गावाशी  जोडलेल्या आहे .तसेच या मार्गाने भटाळा -आसाळा पिजदूरा -पाचगाव येथील शेतकरी शेतात जाण्यासाठी या मार्गाचा वापर करतात, त्यामुळे या भगदाड पडलेल्या रस्त्यावर कधी पण अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मार्गाचे पुलावरील बांधकाम लवकरात लवकर करण्यात यावे, तसेच नादुरुस्त पुलामुळे कुणाचा  अपघात झाल्यास सदर विभागावर मनुष्य व त्याचा गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते किशोर डुकरे यांनी दिला आहे. यासंदर्भातील निवेदन व प्रतिलिपी उपविभागीय अधिकारी वरोरा , कार्यकारी अभियंता  सार्वजनिक बांधकाम विभाग वरोरा, जिल्हा परिषद बांधकाम विभाग शाखा वरोरा वरिष्ठ अभियंत यांना देण्यात आले आहे.
--------------------
*काँग्रेसचे तडफदार नेते, सामाजिक कार्यात कायम अग्रेसर असलेले, खा. प्रतिभाताई यांना सावली साथ देणारे मा. प्रवीणभाऊ काकडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...*  


Comments