वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

*श्री रंगनाथ स्वामी पतसंस्थेचा सभासद मेळावा उत्साहात संपन्न*

*श्री रंगनाथ स्वामी पतसंस्थेचा सभासद मेळावा उत्साहात संपन्न*

वरोरा -
श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, वणी र.नं. ११४२ या संस्थेच्या वरोरा (जि. चंद्रपूर ) शाखेच्या वतीने आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ च्या निमित्ताने दिनांक २६/४/२०२५ रोजी वरोरा येथे स्व. दादासाहेब देवतळे सभागृहात सभासद मेळावा आयोजित करण्यात आला. मेळाव्याचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष ॲड देविदास काळे तर उद्घाटक प्रा. कवडूजी नगराळे , माजी उप प्राचार्य, सहकार प्रशिक्षण केंद्र, अकोला हे होते. 
व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष विवेकानंद मांडवकर, स्थानिक संचालक परिक्षीत एकरे, संपूर्ण संचालक मंडळ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दोरखंडे उपस्थित होते . सभासद मेळावा उत्साहात पार पडला. सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संस्थेचे उपाध्यक्ष श्री विवेकानंद मांडवकर यांनी प्रास्ताविक सादर केले. 
संचालक श्री परिक्षीत एकरे यांनी मनोगत व्यक्त केले. 
श्री कवडुजी नगराळे, माजी उपप्राचार्य, सहकार प्रशिक्षण केंद्र, अकोला यांनी सभासदास मार्गदर्शन केले. 
संस्थेचे अध्यक्ष ॲड. देविदास काळे यांनी अध्यक्षीय भाषणात सभासदास संस्थेच्या प्रगती बाबत व विश्वासार्हते बाबत सांगितले. सभासद हा संस्थेचा मालक आहे परंतु सभासदाने घेतलेले कर्जाची परतफेड नियमित व मुदतीत करण्याचे कर्तव्य सभासदाचे आहे. 
श्री रंगनाथ स्वामी पतसंस्थेचे कार्य प्रशंसनीय असून संस्थेचे ध्येय धोरणे चालवण्याचे काम संचालक मंडळाचे आहे .  संस्थेचे ८७०७५ सभासद असून संस्थेच्या ठेवी ८१८ कोटी ९६ लाख, संस्थेचे कर्जवाटप ४७७ कोटी व नफा २ कोटी ९७ लाख झाला आहे. संस्थेचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य असून सद्यस्थितीत संस्थेच्या मुख्यशाखेसह २२ शाखा कार्यरत आहे.
या मेळाव्यात संस्थेचे उत्कृष्ठ 
ठेवीदार, उत्कृष्ठ कर्जदार,  उत्कृष्ठ कर्मचारी व उत्कृष्ठ दैनिक ठेव अभिकर्तां आणि संस्थेच्या विकासातील मोलाचे योगदाना बद्दल सत्कारमुर्ती चा सन्मानचिन्ह व शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

उत्कृष्ठ ठेवीदार सत्कारमूर्ती 
१) श्री रुपलाल कावळे 
२) परवीनबांनो वडसरिया 
३) श्रीमती सीमा कन्नमवार 
४) सौ सविता विधाते 
५) श्री लक्ष्मण भीवदरे 
६) शाहिद अख्तर शेख 
७) श्री सुभाष डफ 

उत्कृष्ठ कर्जदार सत्कारमूर्ती 
१) श्री ठाकूरदास चांडक 
२) श्री सचिन पेटकर 
३) शेख शाकीर शेख रसूल 

उत्कृष्ठ दैनिक अभिकर्ता सत्कारमूर्ती 
श्री वेणुदास पारखी - प्रथम क्रमांक 
श्री शंकर तडस - द्वितीय क्रमांक 
श्री अनिल पावडे - तृतीय क्रमांक 

उत्कृष्ठ कर्मचारी सत्कारमूर्ती 
१) श्री मिलींद गोंडे 
२) सौ .धनंजया ठावरी 

संस्थेच्या विकासातील मोलाचे योगदाना बद्दल सत्कारमुर्ती 
१) श्री कालिदास धोटे 
२) श्री आनंद वसाके 
३) श्री अशोक चवले 
४) हरेश खडगी, RM सुधन गोल्ड 
या मेळाव्यात संस्थेचे
 परिसरातील नागरिक व संस्थेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
मेळाव्याचे संचालन पायल परांडे यांनी केले व आभार प्रदर्शन संचालक श्री सुरेश बरडे यांनी केले.
मेळाव्याचे यशस्विते करिता  संचालक मंडळ,मुख्य कार्यालय, वरोरा शाखा व्यवस्थापक विलास बोबडे, सहकर्मचारी, दैनिक अभिकर्तागण यांनी परिश्रम घेतले.

Comments