वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

पिक कर्ज उचल सामुहिक क्षेत्रासाठी रू. ५००/- च्या स्टॅम्प ऐवजी रू. १००/- रूपयाचे स्टॅम्प पेपर शेतकऱ्यांसाठी नियमित ठेवण्याबाबत.महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन सादर.

,


 पिक कर्ज उचल सामुहिक क्षेत्रासाठी रू. ५००/- च्या स्टॅम्प ऐवजी रू. १००/- रूपयाचे स्टॅम्प पेपर शेतकऱ्यांसाठी नियमित ठेवण्याबाबत.महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे  यांना निवेदन सादर.

वरोरा :- शेतकऱ्यांना पिक कर्जाकरीता सामुहिक क्षेत्रासाठी रू ५००/- च्या स्टॅम्प ऐवजी रूपये १०० चा स्टॅम्प पेपर नियमित ठेवण्यात यावा. कारण दैनदिन कार्यामध्ये सर्व क्षेत्रात आतापर्यंत रू १००/- च्या स्टॅम्प पेपरनी कार्य होत होते. परंतू आता नविन शासन निर्णया नूसार रू ५००/- रूपयाचा स्टॅम्प घेणे हा शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड पडत असल्यामुळे रू. ५००/- स्टॅम्प शेतकरी पिक कर्जाकरीता बंद करून रू १००/- चा स्टॅम्प पेपर नियमित ठेवण्यात यावा. तसेच सध्या पिक कर्ज वाटपासाठी सामुहिक क्षेत्राकरीता स्टॅम्प पेपर जोडावे लागत असल्यामुळे रूपये रू. ५००/- चा स्टॅम्प भुर्दंड बसत असून तो ताबडतोब रद्द करून रू. १००/- रुपये स्टॅम्प करण्यात यावा असे निवेदन तालुका सेवा सहकारी संस्था संघटना, वरोरा ता. वरोरा जि. चंद्रपूर चे अध्यक्ष श्री. दत्ताभाऊ ब. बोरेकर, उपाध्यक्ष श्री. चंद्रशेखर नौकरकार तसेच सचिव श्री. अरुण खारकर, श्री. मारोतराव मोरे, श्री. सुधीर धामट, श्री. भोजराज आसुटकर यांनी मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे  महसुल मंत्री, महाराष्ट्र राज्य यांना निवेदनात दिले असून त्यांनी ताबडतोच निवेदनाची दखल घेवून शेतकऱ्यांकरीता शेतकरी पिक कर्ज उचल करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे स्टॅम्प लागणार नाही याची गाव्ही देवून तसे आदेश देण्यात आल्याचे कळविण्यात आले.


Comments