वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

शेतीच्या वादातून शेतकऱ्यांनी घेतले विष. प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे शेतकरी त्रस्त.


शेतीच्या वादातून शेतकऱ्यांनी घेतले विष. 

प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे शेतकरी त्रस्त.

वरोरा 
चेतन लूतडे वरोरा 

वरोरा तालुक्यातील बामर्डा येथील एका शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. 

 हेमंत पंढरी हरबडे वय 40 वर्ष राहणार बामर्डा या शेतकऱ्याने शेतातील कीटनाशक द्रव्य प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न स्वतःच्या राहत्या घरी केला. 
हरबडे परिवाराला सिलिंग मधील बारा एकर जमीन मिळाली होती. यामध्ये पंढरी हरभरे व चंपत हरबडे यांना सहा- सहा एकर जमीन मिळाली होती. यानंतर पंढरी हरभरे मृत पावल्यानंतर त्यांचा मुलगा हेमंत पंढरी हरबडे वडीलाची जमीन वाहत होता.  मात्र मिळालेली जमीन ही बारा एकरची नसल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला होता. यासाठी महसूल विभागाकडे काका पुतण्यांनी जमीन मोजण्यासाठी वारंवार प्रयत्न केला. मात्र प्रत्येक वेळेस जमीन कमी पडत होती. सामायिक जमीन 12 एकर चा पट्टा मोजून नंतर अर्धी अर्धी करण्यात यावी असा युक्तिवाद हेमंत हरबळे यांनी केला होता. मात्र या शेतकऱ्याचे म्हणणे कोणीच ऐकून घेत नव्हते. यानंतर चंपत हरबडे यांनी मोजणीला टाकलेली स्वतःची सहा एकर जमीन मोजण्यात आली. व फेंसिंग साठी गड्डे खोदण्याचे काम पोलिस प्रोटेक्शन मध्ये सूरू करण्यात आले होते.
मात्र शेतामधील फेन्सिंगचे गड्डे हेमंत हरबडे यांच्या शेतामध्ये आल्याने   त्यांच्या पत्नीने गड्डे खोदण्यास नकार दर्शविला. संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जोर देत शेतामध्ये गड्डे खोदायला सुरुवात केली. त्यामुळे हेमंत पंढरी हरबळे यांनी वारंवार होत असलेल्या अन्यायाच्या विरुद्ध दाद न मिळाल्यामुळे शेतातील कीटनाश द्रव्य प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळी हजर असलेले पोलीस कर्मचारी यांनी अडवण्याचा प्रयत्न केला. तात्काळ शेतकऱ्याला माढळी रुग्णालया नेण्यात आले. यानंतर वरोरा उपजिल्हा रुग्णालयात शेतकऱ्याला हलवण्यात आले. यानंतर शेतकऱ्याची प्रकृती ठीक असल्याचे सांगण्यात येत आहे. 

मात्र हा वाद गेल्या तीन-चार वर्षांपासून सुरू असून यामध्ये कोणताच तोडगा निघत नसल्यामुळे शेतकऱ्याने विष प्राशन केल्याचे नातेवाईकांनी सांगितले. शेतकऱ्याला साधा न्याय मिळवण्यासाठी विष प्राशन करावे लागते ही खरंच दुःखाची गोष्ट आहे. यावरून प्रशासन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर किती गंभीर आहे हे दिसून येत आहे. 
पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहे. 

Comments