वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

*21 ते 24 एप्रिल या कालावधीत उष्मा लाटेबद्दल जिल्ह्याला येलो अलर्ट**नागरिकांनी काळजी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन*

*21 ते 24 एप्रिल या कालावधीत उष्मा लाटेबद्दल जिल्ह्याला येलो अलर्ट*

*नागरिकांनी काळजी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन*

चंद्रपूर,  दि. 21 एप्रिल : गत आठवड्यापासून जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक 21 ते 24 एप्रिल या चार दिवसाकरिता चंद्रपूर जिल्ह्यात एक दोन ठिकाणी उष्मा लाटेबद्दल सतर्कता वर्तवण्यात आलेली आहे. 
जिल्ह्यात उष्मालाटेच्या संबंधाने येलो अलर्ट जारी केला आहे.  त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी,  असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी केले आहे.

*उन्हाळ्यामध्ये नागरीकांनी उष्ण लाटेपासुन बचाव होण्याच्या दृष्टीने घ्यावयाची दक्षता*
*काय करावे* ?
 पुरेसे पाणी प्या, शरीरातील पाण्याची पातळी योग्य राखा.
 घराबाहेर पडतांना डोके झाकण्यासाठी टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करावा.
 दुपारी 12 ते 4 वाजेदरम्यान घराबाहेर जाणे टाळावे.
 थेट येणाऱ्या सुर्यप्रकाशाला/उन्हाला अडविण्याकरिता घरातील पडदे आणि झडपांचा वापर करावा.
 उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडिओ, टिव्ही, किंवा वर्तमानपत्रातील माहितीचा वापर करण्यात यावा.
 हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत.
*काय करु नये* ?
 उन्हात अतिकष्टाची कामे करू नये.
 दारु, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड थंड पेये घेऊ नये.
 दुपारी 12 ते 4 च्या दरम्यान घराबाहेर जाणे टाळावे.
 उच्च प्रथिनयुक्त आणि शिळे अन्न खाऊ नये.
 लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये.
 गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे.
 बाहेर तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावी.
 उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळावे, तसेच मोकळया हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावी.
 चप्पल न घालता अनवाणी उन्हात चालू नये.
00000

Comments