वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

खाण बाधित क्षेत्रातील महिलांना बांबू हस्तकला प्रशिक्षण**कौशल्य वाढविण्याच्या दृष्टीने बीआरटीसी चा उपक्रम*

*खाण बाधित क्षेत्रातील महिलांना बांबू हस्तकला प्रशिक्षण*

*कौशल्य वाढविण्याच्या दृष्टीने बीआरटीसी चा उपक्रम*

चंद्रपूर : खाणबाधित क्षेत्रातील कारागरांची कार्य कुशलता वाढविण्यासाठी बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रातर्फे (बीआरटीसी) निंबाळा येथे बांबू हस्तकला प्रशिक्षण नुकतेच घेण्यात आले. सदर प्रशिक्षणाचा कालावधी हा 15 दिवसांचा होता. खनिज विकास निधीच्या माध्यमातून महिलांना घरी राहून स्वतःचे कौशल्य सिद्ध करण्याकरिता तसेच आर्थिक मिळकतीत सक्षम होण्याकरिता निंबाळा येथील महिलांना बांबू हस्तकलेचे प्रशिक्षण देण्यात आले.

 या प्रशिक्षणदरम्यान बांबू पासून बनणाऱ्या विविध प्रकारच्या जाळी विणकाम त्यापासून बनणारे उत्पादन शिकवण्यात आले. प्रशिक्षण झाल्यावर टूल किट आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. या प्रशिक्षणाचे आयोजन बांबू संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे संचालक अशोक खडसे, वनपरिक्षेत्र अधिकारी  ए. डी. मल्लेवार,  वनपाल सौदागर लाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षक प्रशिक्षण समन्वयक योगिता साठवणे तसेच हस्तकला निर्देशक  किशोर गायकवाड, तांत्रिक सल्लागार अंतिक मलिक,  कांतीलाल गजभिये, डिप्लोमा इन बांबू टेक्नॉलॉजीचे प्रमुख या सर्व मान्यवरांच्या देखरेखीखाली tasech बांबू सखी  मनीषा शर्मा व अनिता भोयर या प्रशिक्षकांच्या उपस्थितीत पार पडले.

Comments