गणेशोत्सवात नागरिकांसाठी आरोग्य शिबिर; मोरया गणेश व विराट गणेश मंडळाचा अभिनव उपक्रम.

गणेशोत्सवात नागरिकांसाठी आरोग्य शिबिर; मोरया गणेश व विराट गणेश मंडळाचा  अभिनव उपक्रम.  गणेश मंडळाचे अध्यक्ष व नगरसेवक बंडू देऊळकर व आपला दवाखाना यांच्या संयुक्त विद्यमाने समाज उपयोगी उपक्रम. विराट गणेश मंडळाकडून मोफत हेल्थ चेकअपचा लाभ घेण्याचे आवाहन. वरोरा : गणेशोत्सवाच्या उत्साहाला समाजसेवेची जोड देत मोरया गणेश मंडळ, छत्रपती शिवाजी चौक आणि शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र, टिळक वॉर्ड क्रमांक ३, वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभाग क्रमांक २ मध्ये आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात एकूण १११ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये ७० पुरुष आणि ४१ महिलांचा समावेश होता. नागरिकांची बीपी, शुगर तसेच आवश्यक रक्त तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर संबंधित नागरिकांना पुढील उपचाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले. नियमित आरोग्य तपासणी करून आरोग्याबाबत सजग राहण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. शिबिरासाठी डॉ. गोविंद सिंग, वैभव ठाकरे, ओम उगले, सेजल बोरकर (टेक्निकल लॅब), समृद्धी दडमल (टेक्निकल लॅब), महादेव क...

*जिल्हाधिका-यांचा विद्यार्थ्यांसोबत संवाद** भद्रावती येथील विजासन शाळेला भेट*

*जिल्हाधिका-यांचा विद्यार्थ्यांसोबत संवाद*

* भद्रावती येथील विजासन शाळेला भेट*

चंद्रपूर, दि. 14 : 100 दिवस कृती आराखड्याअंतर्गत वरिष्ठ अधिका-यांनी गावात भेटी देऊन शाळा, आरोग्य केंद्र आणि अंगणवाडी आदींची पाहणी करावी तसेच नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घ्याव्यात, अशा सुचना राज्य शासनाच्या वतीने सर्व जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. याच अनुषंगाने चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी भद्रावती येथील विजासन शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला.

यावेळी वरोराचे उपविभागीय अधिकारी जेनीथचंद्र दोन्तुला, भद्रावतीचे तहसीलदार श्री. भांडारकर, संवर्ग विकास अधिकारी आशुतोष सपकाळ, गटशिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश महाकाळकर, नगर पालिकेच्या मुख्याधिकारी शेळकी मॅडम, भद्रावती केंद्राचे केंद्रप्रमुख मोरेश्वर विद्ये आदी उपस्थित होते.                                                    

यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी शाळेतील ऍस्ट्रॉनॉमी लॅबची विद्यार्थ्यांकडून माहिती जाणून घेतली. त्यानंतर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी नियमितपणे अभ्यास करून जीवनात यश प्राप्त करावे. कठोर मेहनतीशिवाय दुसरा पर्याय नाही. आता पुढील महिन्यापासून परीक्षा सुरू होतील. त्याची चांगली तयारी करावी. तसेच शिक्षणासोबतच आपल्यातील कलागुणसुध्दा विकसीत करावे. यावेळी जिल्हाधिका-यांनी शाळेतील परस बागेची पाहणी केली तसेच शाळा, शालेय परिसर या सर्व बाबीविषयी समाधान व्यक्त केले.  

या भेटीच्या वेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जगन्नाथ भाऊ दानव, शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता पेंदा, सहायक शिक्षक अमोल व-हाडे, जीवने मॅडम, चांदेकर मॅडम, डोंगरे मॅडम, सुरज उमाटे, दीपक कावटी व इतर मान्यवर उपस्थित होते.

००००००

Comments