वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

*जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करु**- आ.श्री.सुधीर मुनगंटीवार यांनी दिली ग्वाही**जीवती तालुक्यातील वणी (बु.) येथे सत्कार कार्यक्रम मोठ्या थाटात संपन्न*

*जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करु*

*- आ.श्री.सुधीर मुनगंटीवार यांनी दिली ग्वाही*

*जीवती तालुक्यातील वणी (बु.) येथे सत्कार कार्यक्रम मोठ्या थाटात संपन्न*

*चंद्रपूर - जीवती तालुक्यातील जनता अत्यंत विपरीत परिस्थितीत शेतीतून उत्पादन घेऊन नवा आदर्श स्थापित करीत आहे. येथील जनतेच्या अनेक समस्या आहेत. त्या सर्व समस्या सोडविण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करु, अशी ग्वाही महाराष्ट्र राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.*

जीवती तालुक्यातील वणी (बु.)येथील सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. मंचावर आमदार देवराव भोंगळे, भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, कार्यक्रमाचे आयोजक जिल्हाध्यक्ष भाजयुमो महेश देवकते, विवेक बोढे, नामदेवराव डाहुले, सतीश उपलेंचीवार, दत्ता राठोड तालुका अध्यक्ष, केशव गिरमाजी जिल्हा उपाध्यक्ष, बळीरामजी देवकते माजी पंचायत समिती सदस्य, अंजनाताई पवार, राजेश राठोड, गोविंद टोकरे, प्रल्हाद मदने, पुष्प सोयम, तुकाराम वारलवाड आदींची उपस्थिती होती.

यावेळी आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांचा जेसीबीद्वारे पुष्पवृष्टी करत व विशाल पुष्पहाराने सत्कार करण्यात आला. चिमुकल्यांनी परंपरागत संस्कृतीचे प्रदर्शन करुन स्वागत केले. या स्वागत आणि सत्काराचा स्वीकार करुन आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी जनतेचे आभार मानले व चिमुकल्यांचे कौतुक केले. जनतेचे प्रेम हिच कामाची पावती आहे, असे प्रतिपादनही त्यांनी केले. 

जीवती तालुक्यातील जनतेने विधानसभा निवडणुकीमध्ये देवराव भोंगळे यांना निवडून दिल्याचा आनंद झाला. सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, अध्यक्ष ते आमदार असा प्रवास करुन आलेले भोंगळे हे जनतेवर मनापासून प्रेम करणारे कार्यकर्ते आहेत, असेही ते म्हणाले. 

*प्रलंबित कामे मार्गी लावू*
जीवती तालुक्यातील जनतेचे प्रश्न प्रलंबित आहेत. येथील शेतकरी खडकाळ, डोंगराळ जमिनीवर शेती करतात. जीवती येथील नागरिकांनी दगड फोडून पाणी काढावे, एवढे परिश्रम केले आहेत. त्यामुळे येथील प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही यावेळी आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

Comments